Anna Hazare:मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा? पुण्यात लागले अण्णा हजारे यांना खिजवणारे बॅनर

Anna Hazare:मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा? पुण्यात लागले अण्णा हजारे यांना खिजवणारे बॅनर

विशेष प्रतिनिधी

पुणे : राहुल गांधी यांच्या मतचाेरीच्या कथित आराेपांवरून वातावरण पेटविले जात आहे. या मुद्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना खिजविणारे बॅनर पुण्यात लागले आहेत.



मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?पुण्याच्या पाषाण भागात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना बॅनरच्या माध्यमातून पुणेरी स्टाइलने टोले लगावण्यात आले आहेत. अण्णा आतातरी उठा…कुंभकर्णसुद्धा गाढ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता. तुम्ही आपल्या देशासाठी आतातरी उठा… होय मतांची चोरी झालेली आहे…

मतचोरी प्रकरणी राहुल गांधी आक्रमक झाले असून, यावरून विरोधकांकडून रान पेटवले जात आहे. , सत्ताधारी आणि निवडणूक आयोग विरोधकांचे दावे खोडून काढत आहेतभारतातील भ्रष्टाचार विरोधी चळवळीचा प्रमुख चेहरा म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे पाहिले जाते. अण्णा हजारे बऱ्याच दिवसांपासून आंदोलनापासून दूर आहेत. भारतात सत्तांतर करण्यास अण्णा हजारे यांनी केलेले आंदोलन कारणीभूत ठरल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे २०१४ च्या आधी अण्णा हजारे यांनी केलेल्या आंदोलनचा मोठा फटका काँग्रेसला बसला होता. बराच काळ प्रत्यक्ष आंदोलनांपासून दूर राहिलेले अण्णा हजारे पुन्हा सक्रीय कधी होणार अशी चर्चा कायमच सुरू असते. पुन्हा एकदा पुणेकरांनी बॅनर लावत अण्णा हजारेंना प्रश्न विचारला आहे.

अण्णा हजारे यांना सरकारच्या विराेधात भडकाविण्याचा गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न हाेत आहे. अण्णा हजारे शांत का बसले आहेत? अशी त्यांना विचारणा केली जात आहे. विधीमंडळ अधिवेशनाच्या काळात मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावरूनही अण्णा हजारे यांना लक्ष्य करण्यात आले हाेते.
राज्यात १९९५ साली शिवसेना- भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार असताना तीन मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आराेप अण्णा हजारे यांनी केले हाेते. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी माेठे आंदाेलनही उभारले हाेते. त्यामुळे या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला हाेता.
केंद्रातील तत्कालीन संयुक्त पुराेगामी लाेकशाही आघाडीच्या (यूपीए) सरकारच्या भ्रष्टाचारावरही अण्णा हजारे यांनी माेठे जनआंदाेलन उभारले हाेते. त्या सरकारच्या भ्रष्टाचारावर संपूर्ण देश पेटून उठला हाेता.

“How Can a Senior Gandhian Like You Stay Silent Amid Vote Theft? – Taunting Banners Target Anna Hazare in Pune

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023