Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी, गणेश नाईक यांच्या विधानाने राजकीय गरमागरमी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी, गणेश नाईक यांच्या विधानाने राजकीय गरमागरमी

विशेष प्रतिनिधी

पालघर : एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री झाले , पण कमावलेले टिकविता आले पाहिजे असा टोला भाजपचे नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी लगावला आहे. यावरून पुन्हा एकदा आता भाजप आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. Eknath Shinde

पालघरमधील एका कार्यक्रमात वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली ही आनंदाची गोष्ट आहे. पण कमावलेले टिकवता आले पाहिजे. किती कमवले आणि कसे कमवले? तसेच किती टिकवले? हे महत्त्वाचे आहे. यावर जनसामान्यांची नजर असते.

या वक्तव्यानंतर शिंदे गटाकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता तर आता सत्ता आली नसती. त्यामुळे लॉटरी कोणाला लागली ते त्यांनी ठरवावे, अशी टीका ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली. लॉटरी कोणाला लागली? याचे आत्मपरीक्षण गणेश नाईक यांनी करावे. ‘साठी बुद्धी, नाठी’ असे म्हणतात, त्यांचे वय झाले आहे. त्यामळे ते काय बोलतात त्यांना कळत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

नाईक यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील शिंदेंना टोला लगावला. गणेश नाईक यांच्यावर आम्ही अनेकदा टीका केली. पण नाईक यांनी कधीही संयम सोडून आमच्यावर प्रति टीका केली नाही. लॉटरी हा प्रतिष्ठित शब्द आहे. महाराष्ट्रात आजही बेकायदेशीरपणे मटका सुरू आहे. फडणवीस जरी मुख्यमंत्री असले तरी मटक्याचा आकडा लावला जातो. गणेश नाईक हे सभ्य, संस्कारी असल्यामुळे त्यांनी लॉटरी हा शब्द वापरला. पण, त्यांच्या डोक्यात मटका असेल. मटक्याचे आकडे हे चंचल असतात. मटक्याचा आकडा काढणारे दिल्लीत बसले आहेत, दिल्लीत जाऊन आकडा लावण्याचा प्रयत्न होत आहे पण आकडा लागत नाही अशी टीका राऊत यांनी शिंदे यांच्यावर केली.

भाजपचे नेते गणेश नाईक आणि त्यानंतर संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “राज्यात गेल्या अडीच वर्षांत मुख्यमंत्री म्हणून मी जे काम केले, ते राज्याला माहीत आहे. त्यामुळे विधानसभेला महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला. आम्ही 232 थर लावून विधानसभेची हंडी फोडली. ही विकासाची हंडी आहे. 232 आमदार या महाराष्ट्रात आधी कधी आले नव्हते,” असे म्हणत त्यांनी विरोध करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले.

Eknath Shinde wins the Chief Minister’s post, Ganesh Naik’s statement creates political heat

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023