विशेष प्रतिनिधी
गोंदिया : Ajit Pawar युतीचा विचार डोक्यातून काढून टाकला पाहिजे, युतीचे जमले तर केले पाहिजे, नाही जमले तर सोडून दिले पाहिजे. हे असे आमचे धोरण ठरले आहे. कारण सगळीकडे युती होऊ शकत नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.Ajit Pawar
खासदार प्रफुल्ल पटेल यांनी तिरोडा येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले. यावेळी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, प्रभागामध्ये आपल्याकडे उमेदवार असेल. युतीतील सर्व घटक पक्षाकडे उमेदवार असतील तरी आपल्या पक्षातल्या उमेदवाराला संधी न देणे, दुखावणे हे मला योग्य वाटत नाही, म्हणून जिथे सोयीचे वाटेल तिथे युती बघू. नगराध्यक्षाच्या एखाद्या निवडणुकीमध्ये सगळ्यांच्या मतदानाची आवश्यकता पडते. त्यामुळे एखाद्यावेळी विचार करू, त्यामध्येही खात्री मी देत नाही.Ajit Pawar
आपल्या ताकदीच्या हिशोबाने मिळत असेल, तर आपण विचार करू, असा इशारा देताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, मागच्या वेळी कोणा दुसऱ्याकडे होता तर आताही त्यांच्याकडेच राहील, असे नाही. या नगरपालिकेमध्ये काही देण्याचे ठरलेले नाही. त्यामुळे माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की आपण आज प्रत्येक प्रभाग आणि नगराध्यक्ष आपण लढणार आहोत. या हिशोबानेच आपण कामाला लागले पाहिजे. नाहीतर आपण गफलत मध्ये राहू, असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले आहेत.
महिला आली तर महिला कोण उभी राहील? ओबीसी आला तर ओबीसी मध्ये कोण? जनरल आला तर कसे? एससी एसटी रिझर्वेशन आला तर कसे? या सर्व बाबींचा आपण विचार केला पाहिजे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. घड्याळाला इतरांपेक्षा मतदान जास्त मिळतील ही वस्तुस्थिती लक्षात ठेवली पाहिजे. घड्याळाला मतदान करणारा वर्ग थोडा भिन्न आहे. आपल्याला ते मिळू शकते. त्यामुळे हाही विचार करायला हवा, त्यावर आपण अंतिम निर्णय घेऊ. तसेच आपले कोणी शत्रू नाही. आपला पक्ष वाढवायला संकोच करायचे नाही. दुसऱ्या पक्षाचा कोणी येत असेल तर त्यांना घ्या, वेलकम करा, असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
Remove the idea of alliance from your mind, Ajit Pawar group hints at fighting on its own
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला