विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सात दिवसांमध्ये शपथपत्र दाखल करावे अन्यथा देशाची माफी मागावी, याशिवाय त्यांच्याकडे तिसरा कोणताही पर्याय नाही असा इशारा केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता दिला आहे. Rahul Gandhi
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या चार महिन्यांच्या दरम्यान एक कोटी नवे मतदार वाढल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. यावरही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, महाराष्ट्रात मतदार वाढल्याचा आरोप होतो. मात्र जेव्हा वेळ होती तेव्हा त्या संबंधी प्रश्न का उपस्थित केला नाही. जेव्हा निकाल लागला तेव्हा लक्षात आले की, मतदार वाढले आहेत. मात्र आरोप करणाऱ्यांनी आजपर्यंत एकाही मतदाराचे नाव महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना दिलेले नाही. निवडणूक होऊन आज आठ महिने झाले आहेत. महाराष्ट्रातील उच्च न्यायालायत आजपर्यंत निवडणूक याचिका का दाखल केली गेली नाही? Rahul Gandhi
ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी यांचे कुठेही नाव न घेता त्यांचे सर्व आरोप फेटाळले. ते म्हणाले की, मतदान यादी आणि मतदान प्रक्रिया या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मतचोरीचा आरोप निराधार आहे. एखादी पीपीटी तयार करुन मतदार यादीला चुकीच्या पद्धतीने सादर करुन मतचोरीचा आरोप करणं चुकीचं आहे.
राहुल गांधी यांनी घर क्रमांक शून्य असल्याचा आरोप करत हे बनावट मतदार असल्याचा आरोप केला होता, त्यावर ज्ञानेश कुमार म्हणाले की, 80 हजार मतदारांच्या घराला शून्य क्रमांक असल्याचा आरोप झाला. प्रत्येक ग्रामपंचायत किंवा पालिकेकडून प्रत्येक घराला क्रमांक दिलेलाच आहे असे नाही. देशात असे अनेक मतदार आहेत ज्यांना स्वतःचे घर नाही. तेव्हा ते रात्री ज्या ठिकाणी झोपण्यासाठी जातात तो त्याचा पत्ता समाजला जातो.
अनेक लोक हे रस्त्याच्या कडेला, स्ट्रिट लाईट, पुलाच्या खाली राहतात. अशा प्रत्येक नागरिकापर्यंत निवडणूक आयोग पोहोचलेला आहे आणि त्यांचे घर आहे की नाही हे न पाहता त्यांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे. मतदार होण्यासाठी रहिवासी पत्ता हा महत्त्वाचा नसून भारतीय नागरिक असणे महत्त्वाचे आहे. याला जर मतचोरी म्हटले जात असेल तर ते चुकीचे आहे. काही लोकांचे दोन ठिकाणच्या मतदार यादीत नाव असले तरी ती व्यक्ती एकाच ठिकाणी मतदान करते. दोन ठिकाणी मतदान करणे कायदेशीर गुन्हा आहे. जरी असे असेल तर त्याचा पुरावा पाहिजे.
पत्रकार परिषद घेऊन दीड लाख मतदार हे बनावट असल्याचा आरोप केला म्हणून त्या दीड लाख मतदारांना नोटीस बजावणे न्यायसंगत नाही. त्यामुळे असे गंभीर आरोप केल्यानंतर विना शपथपत्र अशा आरोपांवर गांभीर्याने विचार करता येणार नाही, असे प्रत्युत्तर ज्ञानेश कुमार यांनी दिले. निवडणूक आयोग मतदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. जर सात दिवसांत शपथपत्र दाखल केले नाही, तर त्याचा अर्थ हे सर्व आरोप निराधार आहेत, त्यांना देशाची माफी मागावी लागले असेही ज्ञानेश कुमार म्हणाले.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत शेवटच्या एक तासात मतदान वाढल्याचा आरोप काँग्रेस आणि इतरही विरोधी पक्षांकडून करण्यात आला. त्याचे व्हिडिओ पुरावे निवडणूक आयोगाकडे मागण्यात आले, त्यावर ज्ञानेश कुमार म्हणाले की, याचे उत्तर याआधीच निवडणूक आयोगान दिले होते. जर दहा तास मतदान झाले तर प्रत्येक तासाला 10 टक्के मतांची सरासरी टक्केवारी असते. मात्र शेवटच्या एका तासात सरासरी 10 टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले. त्यामुळे कोणी जर दहा वेळा एखादी गोष्ट बोलत असेल तर ती खरी होत नाही. सत्य सत्य असते आणि सूर्य पूर्वेकडूनच उगवतो. कोणाच्या सांगण्यावरुन पश्चिमेकडून उगवत नाही.
Chief Election Commissioner warns Rahul Gandhi over alleged election scam in Maharashtra
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला