विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ५२ पत्त्यांच्या गड्डीत सर्वच जोकर असून जनतेने त्यांना ‘महाजोकर’ करून घरी बसविले आणि फडणवीस मुख्यमंत्री झाले, ही वस्तुस्थिती ‘माकडछाप’ राऊत यांनी लक्षात घ्यावी, असे प्रत्युत्तर भाजपच्या माध्यम विभागाचे प्रमुख नवनाथ बन यांनी दिले आहे. अदानींची हंडी फोडून मलई खाणारे आणि धारावीसह मुंबईतील मोक्याचे भूखंड त्यांच्या घशात घालणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘जोकर’ असल्याची टीका शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केली होती.
राऊत यांच्या टीकेमुळे भाजपमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली. ‘एकतर तू राहशील किंवा मी राहीन’ असे आव्हान ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी फडणवीस यांना दिले होते. जनतेने फडणवीस यांना भक्कम साथ देऊन मुख्यमंत्रीपदी बसविले व ठाकरे यांना घरी पाठविले, असे बन यांनी स्पष्ट केले. खरे महाजोकर तुम्ही आणि ठाकरे गट असल्याचे मुंबईकर आणि मराठी माणूस दाखवून देईल, असे प्रत्युत्तर बन यांनी राऊत यांना दिले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर राजकारणात फडणवीस हे जोकर असल्याची टीका राऊत यांनी केली होती. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडणार असल्याचे वक्तव्य फडणवीस यांनी केले होते. त्यावर आम्ही महापालिकेच्या ९० हजार कोटी रुपयांच्या ठेवी बँकेत ठेवल्या होत्या. आम्ही पालिका लुटली असती, तर एवढ्या ठेवी कशा ठेवल्या असत्या?
उलट हे ९० हजार कोटी रुपये महायुती सरकारने लुटले आहेत. फडणवीस हे अदानींना मुंबईतील मोक्याच्या जमिनी देऊन मुंबई लुटत आहेत आणि भ्रष्टाचार करीत असल्याची टीका राऊत यांनी केली होती. राज्याच्या तिजोरीत पैसे नाहीत, पण दोन लाख कोटी रुपयांची कामे ज्यांनी कंत्राटदारांना दिली, त्यांना २५ टक्के कमिशनचे पैसे मिळाले आहेत. त्यात फडणवीस यांच्या सहकाऱ्यांचा समावेश असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
People made Uddhav Thackeray a ‘mahajoker’ and made him sit at home, BJP’s reply to Raut
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला