विशेष प्रतिनिधी
मुंबई : द बेस्ट एम्प्लॉइज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांना सहकार समृद्धी पॅनलच्या वतीने बंद लिफाफ्यातून पैसे पाठवण्याची आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पाठवण्यात आलेली लिफाफे हे देखील प्रसारमाध्यमांसमोर सादर केले. एकीकडे मतदान सुरू असताना दुसरीकडे पैसे वाटपाच्या झालेल्या आरोपांमुळे आता एकच खळबळ उडाली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांचे पक्ष या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ठाकरे बंधू यांच्या उत्कृष्ट पॅनल समोर महायुतीच्या नेत्यांचे सहकार समृद्धी पॅनल रिंगणात उतरवलेले आहे. या पत संस्थेवर मागील 25 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप महायुतीच्या नेत्यांनी केला होता. मात्र आता महायुतीवरच संदीप देशपांडे यांनी निवडणुकीच्या दरम्यान पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप केला आहे.
बेस्ट पतपेढी निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे. या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यांच्याविरुद्ध महायुती प्रणित पॅनल उभे आहे. निवडणुकीची जबाबदारी महायुतीच्या वतीने प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत उत्कर्ष पॅनल बाजी मारणार की, सहकार समृद्धी पॅनल? याची उत्सुकता राज्याला लागली आहे.
या निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि मनसे यांनी एकत्रितरित्या उत्कर्ष पॅनल उभे केले आहे. तर महायुतीच्या वतीने सहकार समृद्धी पॅनेल रिंगणात उतरवण्यात आले असून यामध्ये प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कर्ष सभा, नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना आणि शिंदेंच्या सेनेचे किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांचा समावेश आहे. यासोबतच शशांक राव यांचा शशांक राव पॅनेल आणि मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचा बेस्ट परिवर्तन पॅनेलदेखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. ही निवडणूक रंगतदार होणार आहे. कारण ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी आर्थिक गुन्हे शाखेची या निवडणुकीत एन्ट्री झाल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत महायुतीच्यावतीने मागील अनेक वर्षे पतसंस्थेवर सत्ता असणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे.
ही निवडणूक गेल्या चार वर्षांपासून रखडली होती. या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी युती केल्यामुळे या निवडणुकीविषयीची उत्सुकता वाढली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वीची लिटमस टेस्ट म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलमध्ये 21 पैकी 19 जागा ठाकरे गट आणि दोन जागा मनसेकडून लढवण्यात येतील. निवडणुकीच्या काही दिवस आधी शिंदे गटाच्या माझगाव येथील कर्मचारी बबिता पवार यांनी ठाकरे बंधूंच्या पॅनेलमध्ये प्रवेश केला होता. ही निवडणूक ठाकरे बंधूंनी जिंकल्यास आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्यादृष्टीने ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश जाईल.
Sandeep Deshpande alleges money laundering in the elections of The Best Employees Cooperative Credit Society
महत्वाच्या बातम्या
- CP Radhakrishnan Profile : तामिळनाडूत जन्म, 16 वर्षे वयापासून RSS मध्ये, 2 वेळा खासदार, तमिळनाडू भाजपाध्यक्षही होते
- मतदार यादीतल्या चुका 1 सप्टेंबर पर्यंत सांगा; निवडणूक आयोगाचे 12 राष्ट्रीय पक्षांना आवाहन
- Vote Chori : मुख्य निवडणूक आयुक्तांच्या परखड प्रत्युतरानंतर देखील राहुल गांधींचा सकट सगळ्या विरोधकांचे निवडणूक आयोगावर पुन्हा तेच आरोप!!
- CP Radhakrishnan उपराष्ट्रपती पदासाठी मोदींचे पुन्हा सरप्राईज; यादीतली सगळे नावे बाजूला; महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन यांना संधी!!