विशेष प्रतिनिधी
चेन्नई : C. P. Radhakrishnan’s द्रविडीयन राजकारणावर स्वार होऊन भाजपचा सामना करणाऱ्या द्रविड मुनेत्र कळघमला (डीएमके) भारतीय जनता पक्षाने प्रत्युत्तर दिले आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार म्हणून तमिळनाडूचे ज्येष्ठ नेते व सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची घोषणा म्हणजे तामीळनाडूच्या राजकारणातील भाजपचा मास्टरस्ट्राेक मानला जात आहे.C. P. Radhakrishnan’s
भाजपच्या तमिळनाडूतील राज्याध्यक्ष नैनार नागेंद्रन यांनी ही निवड “तमिळ अभिमानाचा क्षण” असल्याचे सांगत डीएमकेला माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी पाठिंबा न दिल्याची “ऐतिहासिक चूक” दुरुस्त करण्याचे आवाहन केले.C. P. Radhakrishnan’s
माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी उपाध्यक्ष निवडणूक ही तमिळनाडूच्या “राष्ट्रीय नेतृत्वातील योगदानाचा गौरव करण्याची संधी” असल्याचे म्हटले. राधाकृष्णन हे “मातीचे पुत्र” असल्याचे त्यांनी नमूद केले.
राधाकृष्णन यांच्या प्रचारासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची निवड झाली असून त्यांनी मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांना फोन करून सर्वानुमते पाठिंबा देण्याची विनंती केली आहे.
भाजपच्या सहयोगी एआयएडीएमकेने देखील या उमेदवारीस पाठिंबा दिला. पक्षनेते एडप्पडी के. पलानीस्वामी म्हणाले, “राधाकृष्णन तमिळनाडूचे असल्याने ही राज्यासाठी मोठी संधी आहे. सर्व खासदारांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एनडीए उमेदवारास पाठिंबा द्यावा.”
मात्र डीएमकेने भाजपच्या या पावलाला नकार दिला. वरिष्ठ नेते टी. के. एस. इलंगोवन म्हणाले, “फक्त तमिळनाडूतला व्यक्ती उमेदवार म्हणून उभा केला म्हणजे भाजप प्र-तमिळनाडू झाला असे होत नाही.” त्यांनी केंद्राकडून निधी न मिळाल्याचा आरोपही पुन्हा केला.
डीएमके वर्तुळात तर चर्चा आहे की पक्षाचे खासदार तिरुची शिवा हे इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. यामुळे उपराष्ट्रपती पदासाठी दोन तमिळ नेत्यांमध्ये थेट सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेसने देखील भाजपच्या प्रयत्नांना नकार दिला. राज्याध्यक्ष के. सेल्वपेरुंथगै यांनी म्हटले, “भाजप कितीही प्रयत्न केला तरी तमिळनाडू कधीही त्यांना स्वीकारणार नाही. राष्ट्रपतीपदासाठीसुद्धा ते येथे उमेदवार दिला तरी त्यांची फुटीर विचारसरणी राज्य मान्य करणार नाही.”
त्याचप्रमाणे डीएमकेचा सहयोगी पक्ष असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने स्पष्ट केले की राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही. “त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाली तरी तमिळनाडूस काहीच फायदा होणार नाही,” असा दावा पक्षाने केला.
दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सी. पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्रातील आहेत. त्यांचे येथील मतदारयादीत नाव आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत मतदान केले असल्याचे सांगत महाविकास आघाडीला आणि प्रामुख्याने मराठी अस्मितेचे राजकारण करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाल राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
C. P. Radhakrishnan’s candidature, BJP’s masterstroke in Tamil Nadu politics
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला