विशेष प्रतिनिधी
मुंबई : मोनोरेलची घटना दुर्दैवीच आहे. क्षमतेपेक्षा अधिकचे लोक बसल्यामुळे मोनोरेलची घटना घडली. सर्वांनीच याची काळजी घेण्याची गरज आहे. अशा प्रकारचा प्रसंग झाल्यानंतर यावर राजकारण करण्याची गरज नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना सुनावले आहे. monorail
चेंबूर आणि मैसूर कॉलनीदरम्यान मंगळवारी मोनोरेल ठप्प झाली. यावेळी तब्बल 300 प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली. यावर विरोधक करत असलेल्या टीकेवर अजित पवार म्हणाले, मोनोरेल बंद पडली याचे कारण समोर आले की, मोनोरेलच्या क्षमतेपेक्षा काही टन वजन जास्त झाले. यामुळे आतमधील प्रवासी गुदमरले. त्यानंतर काही ठिकाणच्या काचा फोडून शिड्या लावून लोकांना खाली उतरवण्यात आले. थोडा वेळ लागला पण आम्ही या घडामोडींवर लक्ष ठेवून होतो. हे कोणीही मुद्दाम केलेले नाही. जास्त लोकं बसल्यामुळे ही घटना घडली. त्यानंतर पुन्हा मोनोरेल पूर्ववत करण्यात आली.
आम्ही सातत्याने लोकांना आवाहन करत आहोत की, गरज असेल तरच बाहेर पडा. अनेकांनी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी दिली आहे. हवामान खात्याने आधीच अनेक ठिकाणी रेड अलर्ट दिलेला आहे. या सर्व माहितीचा अंदाज घेऊनच आम्हीही पुढची पाऊले उचलतो.” असेही अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवार म्हणाले, अनेक ठिकाणी सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत. वसई-विरार मोठ्या प्रमाणात पाण्यामध्ये गेलेले आहे. स्मार्ट रोडवर असा भाग तिथला बराचसा भाग पाण्यात गेलेला आहे. नांदेडमध्ये काही गावांना वेढा पडलेला होता. त्या गावाच्या लोकांची घर पडली आहेत. आज लोक तिथे गेलेले आहेत. त्या संदर्भात एकंदरीत सर्वेक्षण करुन, ही परिस्थिती कायम राहणार आहे का? जर कायम राहणार असेल, पुन्हा धोका येऊ नये म्हणून सुरक्षित ठिकाणी आपण स्थलांतर करतो. पुन्हा पाऊस झाला, तर लोकांना अडचण येऊ नये अशी काळजी सरकारकडून घेतली जाईल. नैसर्गिक संकट असून यावर मात करण्यासाठी अडचणीत असलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी, सुरक्षित स्थळी नेण्यासाठी जी काही खबरदारी घ्यावी लागते, त्यासाठी रात्रंदिवस लोक राबतात. दुर्लक्ष होऊ नये याची काळजी सरकार घेत आहे.
पुण्यामध्ये खडकवासलाचे पाणी सोडल्याने पातळी वाढत चालली आहे. तिथे जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिका आयुक्त, एनडीआरएफ आणि एसडीआरएफला अलर्ट राहायला सांगितले आहे. काही भागात पाणी जास्त झाल्याने तेथील लोकांना स्थलांतर करण्यास सुरूवात केली आहे. नदीला खडकवासला धरणाचे पाणी आल्याने त्यामुळे खालचे पूल पाण्याखाली गेले आहेत. कोणीही धोका पत्कारू नये अशा सूचना दिल्या आहेत,” अशी माहिती पुण्याचेअजित पवार यांनी दिली.
No need to politicize the monorail accident, Ajit Pawar tells the opposition
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला