विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Rekha Gupta मुख्यमंत्री निवासस्थानी जनसुनावणी दरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर एकाने हल्ला केला. त्यांना थप्पड मारण्यात आल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. मात्र, दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी थप्पड मारल्याच्या घटनेचा इन्कार केला आहे.Rekha Gupta
दिल्ली मुख्यमंत्री कार्यालयाने यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आज सार्वजनिक सुनावणीदरम्यान एका व्यक्तीने मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला केला. आरोपीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे.Rekha Gupta
दिल्ली भाजपचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर याबाबत बोलताना म्हणाले, एक ३५ वर्षीय व्यक्ती जनसुनावणीला आला होता. त्याने मुख्यमंत्र्यांना काही कागदपत्रे दिली. त्यानंतर काही वाद झाला. त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे हताश झालेल्या कोणत्याही पक्षाचे काम असू शकते.Rekha Gupta
जनसुनावणीला उपस्थित असलेल्या एका नागरिकाने सांगितले की, मी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या गेटवर पोहोचताच गोंधळ उडाल्याचे पहिले. मुख्यमंत्र्यांना थप्पड मारण्यात आल्याची चर्चा होती. मात्र हे पूर्णपणे पूर्णपणे चुकीचे आहे.
मात्र, जनसुनावणीसाठी आलेल्या एका महिलेने सांगितले, मुख्यमंत्र्यांशी बोलत असताना अचानक त्याने थप्पड मारली. पोलिस त्याला अटक करून घेऊन गेले आहेत.
जर मुख्यमंत्रीच सुरक्षित नसतील तर सामान्य माणसाची काय स्थिती असेल? असा सवाल काँग्रेसने केला आहे. दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव म्हणाले, ही घटना दुर्दैवी आहे. रेखा गुप्ता संपूर्ण दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत. अशा घटनांचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी. या घटनेने महिलांच्या सुरक्षा व्यवस्थेचा पर्दाफाश केला आहे. जर दिल्लीच्या मुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सामान्य पुरुष किंवा महिला कशी सुरक्षित राहू शकेल?
दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या आणि आप नेत्या आतिशी यांनी म्हटले आहे की, रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे. लोकशाहीमध्ये असहमती आणि निषेधाला स्थान असते, परंतु हिंसाचाराला स्थान नसते. दिल्ली पोलिस दोषींवर कठोर कारवाई करतील अशी आशा आहे. मुख्यमंत्री पूर्णपणे सुरक्षित असतील अशी आशा आहे
There is talk of Delhi Chief Minister Rekha Gupta being attacked and slapped during a public hearing, but BJP denies it.
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला