विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्राचा सांस्कृतिक आत्मा असलेला गणेशोत्सव यंदा राज्य महोत्सव म्हणून अधिक भव्यतेने साजरा होणार आहे. गणेशोत्सवाच्या सात दिवसांसाठी (चौथा आणि नववा दिवस वगळून) रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली. Ashish Shelar
शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत गणेश मंडळांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीला आमदार हेमंत रासने, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते. ध्वनी नियमांचे पालन करून 24 तास उत्सव सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मंडप बंद करण्याची सक्ती नसेल आणि राज्यभरातील भक्तांसाठी हॉटेल्स खुली राहतील.
गणेश मंडळांना दिलासा देणारे अनेक निर्णय या बैठकीत घेण्यात आले. विद्युत परवानगीसाठी दरवर्षी नवीन कागदपत्रे सादर करण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. गेल्या वर्षीची विद्युत परवानगी यंदा ग्राह्य धरली जाईल, ज्यामुळे मंडळांचा प्रशासकीय ताण कमी होईल.टप्प्याटप्प्याने वीजदर आकारण्याऐवजी एकसमान दर आकारणीचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मंडळांना आर्थिक दिलासा मिळेल.
या निर्णयांमुळे गणेशोत्सवाचा उत्साह द्विगुणित होणार असून, मंडळांना सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असे सांगून मंत्री आशिष शेलार यांनी गणेशोत्सवाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले.
Loudspeaker Use Allowed in Pune During Ganesh Festival Till Midnight, Says Ashish Shelar
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला