विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमातील माझ्या उपस्थितीचा कृपया राजकीय अर्थ काढू नये. समाजातील महिलांचे कार्य समजून घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हाच माझा उद्देश होता, आहे आणि राहील, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. Sunetra Pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली. खासदार सुनेत्रा पवार या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित स्नेहमेळाव्यात उपस्थित होत्या. भाजपा खासदार कंगना रनौतच्या घरी राष्ट्रसेविका समितीच्या शाखेतील हा कार्यक्रम होता.
अजित पवारांच्या विचारसरणीवर प्रश्न उपस्थित करत. यावरून विरोधकांकडून आता अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील यावरून निशाणा साधला आहे. त्यांच्यावर कदाचित दबाव असावा असा टोला यावेळी रोहित पवार यांनी लगावला आहे. दरम्यान त्यानंतर आता खासदार सुनेत्रा पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे, त्यांनी ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, एका मीटिंगमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू आहे, ज्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की त्यामागे कोणताही राजकीय उद्देश्य नव्हता. यात इतर महिला खासदारही सहभागी होत्या.
राज्यसभेच्या खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना, मला विविध महिला संघटनांच्या कामाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची उत्सुकता असते. त्या बैठकीत विविध राज्यांतील महिला सहभागी होत्या. त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठीच मी तिथे गेले होते. त्या वेळी मला बोलण्यास सांगितले, तर मी फक्त दोन शब्दात माझी भूमिका मांडली.
राष्ट्रसेविका समिती ही संघ परिवारातील महिलांसाठी काम करणारी संघटना आहे. कंगना रनौतने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार भाषण करत असून बाजूला भारतमातेच्या फोटोसह आरएसएसचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींचे फोटो आहेत.
Sunetra Pawar clarified her stance that her presence at the Sangh’s program should not be interpreted politically
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला