विशेष प्रतिनिधी
मुंबई : बेस्टमध्ये कंत्राटी पद्धत लागू करुन हा उपक्रम खड्ड्यात पाप आदित्य ठाकरे यांनी केले अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे सचिव किरण पावसकर यांनी केली आहे. बेस्टमध्ये कंत्राटीपद्धतीने बस आणल्या, हजारो कर्मचाऱ्यांची भरती केली. ज्या चार कंत्राटदारांनी बेस्टचे कंत्राट दिले हे चारही कंत्राटदार आदित्य ठाकरे यांचे मित्र असल्याचा आरोपही पावसकर यांनी केला आहे. Aditya Thackeray
बेस्ट पतपेढीच्या निवडणूकीत मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने एकत्र लढवल्यानंतरही यात त्यांना एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. या पार्श्वभूमीवर किरण पावसकर बोलत होते. ते म्हणाले, मागील २५ वर्षात मित्र परिवारातील २१ कंपन्यांना मुंबई महानगर पालिकेची कंत्राटे वाटण्यात आली आहेत. त्यामुळे बेस्ट सारखी संस्था डबघाईला आल्याचे सांगून पावसकर म्हणाले, यातील १६ ते १८ कंपन्या काळ्या यादीतील आहेत आणि त्या सर्व अमराठी लोकांच्या आहेत.
मिठी नदीचा गाळ उपसण्याचे कंत्राट देखील आदित्य यांच्या शिफारशीवरुन अभिनेता दिनो मोरिया याला देण्यात आले होते. दिनो मोरियाची चौकशी सुरु असून लवकरच सत्य बाहेर येईल, असे पावसकर म्हणाले. निवडणुका आल्या की मराठी भाषा आणि मराठी माणसाबाबत गळे काढायचे आणि पालिकेतील कंत्राटे मात्र अमराठी मित्रांना द्यायची हे आदित्य ठाकरे यांचे धोरण राहिले आहे.
मुंबई महापालिकेत २५ वर्ष सत्ता असताना शिवसेना ठाकरे घटाने बेस्ट कामगारांसाठी काही केलं नाही, त्यांनी कामगारांना वाऱ्यावर सोडले. बेस्टच्या कामगार वसाहतींची दुरवस्था झाली असल्याचे पावसकर म्हणाले. याउलट मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांबरोबरच बेस्ट कर्मचाऱ्यांनाही २९ हजार रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला. शिंदे यांनी महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांसाठी निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
Kiran Pawaskar alleges that BEST is in a hole because Aditya Thackeray gave contracts to his friends
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला