विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : पत्रकार आणि युट्युबर अभिसार शर्मा यांच्याविरुद्ध गुवाहाटी क्राईम ब्रांचनेगुन्हा दाखल केला आहे. स्थानिक रहिवासी आलोक बरुआ यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. तक्रारीत म्हटले आहे की, अभिसार शर्मा यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर “धार्मिक राजकारण” करण्याचा आरोप करत सरकारविरुद्ध भडकावू वक्तव्ये केली.
या प्रकरणात शर्मांवर भारतीय दंड संहिता 2023 (Bharatiya Nyaya Sanhita, BNS) मधील कलम 152 (देशद्रोह), 196 आणि 197 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार आलोक बरुआ यांनी आरोप केला की,अभिसार शर्मा यांनी त्यांच्या यूट्यूबवरील व्हिडिओमध्ये असम सरकार आणि केंद्र सरकार दोघांनाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला.”सरकार हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणावर टिकून आहे” असे विधान करून त्यांनी साम्प्रदायिक भावना भडकवल्या. शर्मा यांनी “रामराज्य” या संकल्पनेची थट्टा केली आणि मुख्यमंत्री साम्प्रदायिक राजकारण करत असल्याचे म्हटले. अशा वक्तव्यांमुळे समाजात अविश्वास, वैमनस्य आणि असंतोष पसरू शकतो, ज्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते.
तक्रारीनुसार, अभिसार शर्मा यांची टिप्पणी ही केवळ सरकारविरोधातील टीका नसून ती देशाची एकता, सार्वभौमत्व आणि प्रामाणिकता धोक्यात आणणारी असल्याचे नमूद केले आहे. सरकारला “भ्रष्ट, धर्मांध आणि बेकायदेशीर” ठरवून त्यांनी लोकांमध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यामुळेच त्यांच्याविरुद्ध BNS च्या कलम 152 अंतर्गत देशद्रोहासमान गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Case registered against journalist Abhisar Sharma in Assam
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला