विशेष प्रतिनिधी
बीड: महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा हा वाद कधीच नव्हता. मात्र, या वादाचे मूळ शरद पवार आहे. त्यांच्या सांगण्यावरून जरांगे नावाचे मूळ महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसले असून याने महाराष्ट्रातील भाईचारा बिघडला असल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. Laxman Hake
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट रोजी मुंबईत मोर्चा काढणार आहेत. मराठा समाजाचा समावेश इतर मागासवर्गीय ( ओबीसी) प्रवर्गात करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी महाराष्ट्रात ओबीसींची संघर्ष यात्रा निघणार असल्याचे लक्ष्मण हाके यांनी जाहीर केले आहे. त्यासाठी लक्ष्मण हाके मराठवाड्यातील जिल्ह्यात बैठका घेत आहेत. बीड येथे बोलताना ते म्हणाले, आमचे आंदोलन जरांगेंच्या आंदोलनाला ओबीसीचे काउंटर आंदोलन नसून मुंबईत जाऊन ट्रॅफिक जाम केली जाणार नाही.
महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन होणार आहे. आमचे आंदोलन व्यवस्थेला चॅलेंज करणारे नसून संविधानाला धरून असणार आहे.
मराठा आरक्षण मागणं हा जरांगे पाटील यांचा फास आहे. ओबीसी आरक्षण संपवणे हा त्यांचा डाव असल्याचा आरोप करत हाके म्हणाले, त्यांना आरक्षणाचे काही पडले नसून ओबीसीचे आरक्षण संपवायचे आहे. पंचायत राजच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते मुंबईला निघाले आहेत.
दरम्यान, मनोज जरांगे हे देखील राज्यात मोर्चाच्या तयारीसाठी बैठका घेत आहेत. ते म्हणाले, For Card५८ लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत. आता सरकारला काय पुरावा पाहिजे? कुणबी मराठा आणि मराठा हा एकच आहे हा जीआर सरकार आता काढू शकते.
Sharad Pawar Behind OBC–Maratha Row, Alleges Laxman Hake
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला