विशेष प्रतिनिधी
पुणे : पाच हजार कोटी रुपयांची फाइल सहजपण फिरत असेल, तर याला भ्रष्टाचार म्हणू शकतो. बारा हजार पानांचे हे पुरावे आहेत. आमच्याकडे असलेला पेनड्राइव्ह पण तुमच्यापर्यंत देतो. तुम्ही हे पुरावे पाहणार आहात का? अशी विचारणा करत राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे आमदार राेहित पवार (Rohit Pawar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्री संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर बिवलकर कुटुंबाला जमीन दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बॅग भरून पुरावे सादर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणाची दखल घेण्याचे आवाहन केले, रोहित पवार यांनी बिवलकर कुटुंबांचा १९९३ चा अर्ज, सिडकोने फेटाळलेले आधीचे चार अर्ज, विधी व न्याय विभागाचा अहवाल, नगर विकास विभागाने १ मार्च २०२४ ला सिडकोला दिलेले पत्र, सिडकोचा ठराव आणि सिडकोचे सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र असे पुरावे माध्यमांसमोर दाखवले.
रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, बिवलकर कुटुंबाचा साडेबारा टक्क्यासाठी अर्ज २८ जुलै १९९३ आला होता. या अर्जात त्यांनी सांगितले की, आम्ही चुकीचे ठरलो, तर आम्ही पूर्ण जमीन सिडकोला देणार आहोत. तांत्रिकदृष्ट्या पाहिल्यास बिवलकर कुटुंब चुकीचेच ठरलेले आहेत. सिडकोने बिवलकरांचा अर्ज चार वेळा फेटाळला. १८ एप्रिल १९९४ रोजी पहिल्यांदा अर्ज फेटाळला. त्यानंतर १९९५ आणि २०१० मध्ये आधीचे कारण देत सिडकोने बिवलकर कुटुंबाचा अर्ज फेटाळून लावला.
विधी व न्याय विभागाच्या अहवालानुसार, आम्ही बिवलकरांना परवानगी दिली, असे विजय सेहगल यांनी सांगितले होते. पण त्यांनी सांगितलेले चुकीचे सांगितले आहे. विधी व न्याय विभागाने अहवाल दिल्यानंतर, त्यावर सिडकोने नकारात्मक भूमिका घेत, तो अहवाल चुकीचा असल्याचे राेहित पवार यांनी सांगितले.
संजय शिरसाटांना त्यांच्या पदावरून काढा. कारण ते सुसाट सुटले. जर तुम्हाला पैशाची गरज लागली, तर शासनाकडे या. शासनाचे पैसे संपले, तर माझी बॅग उघडी आहे, असे वक्तव्य त्यांनी कालच केले आहे. अशा भ्रष्ट्र माणसाला पदावर ठेवू नका. पुरावे आम्ही दिलेले आहेत. या सर्व प्रकरणाची शहानिशा होईपर्यंत ६१ हजार स्वेअर मीटरच्या भूखंडाचे हस्तांतरण थांबवावे. ८ हजार स्वेअर मीटरचा भूखंड एका प्रायव्हेट व्यक्तीला दिलेला आहे. तो सुद्धा परत मागून घ्यावा. संजय शिरसाट यांचा दोन दिवसांत राजीनामा घ्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
Rohit Pawar demands resignation of Minister Sanjay Shirsat from Chief Minister, providing 12,000 pages of evidence
महत्वाच्या बातम्या
- NDA बिहार निवडणुकीसाठी एनडीएची जागावाटप चर्चा अंतिम टप्प्यात
- Uddhav Thackeray : गणराया, अपशकुनी मांजरांचा बंदोबस्त कर, उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
- Manoj Jarange : प्रत्येकाने मुंबईला यावे, आता ही शेवटची लढाई, मनोज जरांगे यांचे मराठा समाजाला आवाहन
- Ajit Pawar “मग योजना बंद करू का?” बोगस लाभार्थी प्रकरणावर अजित पवारांचा सवाल