विशेष प्रतिनिधी
दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक विश्लेषक संजय कुमार यांना मोठा दिलासा दिला आहे. नागपूर आणि नाशिक पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांवर कारवाई स्थगित ठेवत न्यायालयाने संजय कुमार यांना संरक्षण दिले आहे. Sanjay Kumar
मुख्य न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजरिया यांच्या खंडपीठाने कुमार यांच्या याचिकेवर सुनावणी घेतली. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत, लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी ट्विटर (X) वर पोस्ट केलेल्या मतदार आकडेवारीत चुका झाल्यामुळे त्यांच्यावर दाखल झालेल्या एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. Sanjay Kumar
कुमार यांनी १७ ऑगस्ट रोजी मतदारांच्या आकडेवारीची तुलना करणारे पोस्ट केले होते. त्यानंतर त्यात विसंगती असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशीच ती पोस्ट डिलीट केली आणि १९ ऑगस्टला सार्वजनिकरीत्या माफी मागत चुका त्यांच्या सहकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीमुळे झाल्याचे स्पष्ट केले.
कुमार यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, त्यांच्या तीन दशकांच्या सेवेत त्यांची प्रामाणिकता निर्विवाद आहे. हा प्रकार हा अनावधानाने झालेला दोष असल्याचे स्पष्ट करत पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर ही अत्याधिक कारवाई असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
न्यायालयाने संजय कुमार यांना अंतरिम दिलासा देत गुन्ह्यांवरील कारवाई थांबवली असून, या प्रकरणाचा पुढील तपास करून निर्णय देण्याचे सांगितले आहे.सुप्रीम कोर्टाच्या या आदेशामुळे संजय कुमार यांना मोठा दिलासा मिळाला असून, निवडणूकपूर्व वादग्रस्त आकडेवारीच्या वादावर आता अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे.
Supreme Court gives relief to election analyst Sanjay Kumar; Maharashtra cases over misleading voter data stayed
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला