विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानात उपोषण करण्यास मनाई केली आहे. कोर्टाने या प्रकरणी त्यांना मुंबईबाहेर आंदोलन करण्याची सूचना केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनाेज जरांगे २९ ऑगस्टपासून उपाेषणाला बसणार आहेत. Manoj Jarange
मनोज जरांगे बुधवारी सकाळी दहा वाजाता मुंबईच्या दिशेने माेर्चा घेऊन येत असताना हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे जरांगे या प्रकरणी कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा सामाजाला आरक्षण मिळण्यासाठी मुंबईत आंदोलन करणार आहेत. Manoj Jarange
27 ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे कूच करणार आहेत. त्यात आता गणेशोत्सव सुरू होणार असून मुंबईत मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. भाविकांची लाखोंच्या संख्येने गर्दी असते. अशात आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होण्याची शक्यता असल्याने भाजपकडून मनोज जरांगे यांनी आंदोलन पुढे ढकलावे अशी विनंती करण्यात आली आहे. मात्र, ही विनंती जरांगे यांनी मान्य केलेली नाही.
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. त्यामुळे लोकशाही पद्धतीने कुणी आंदोलन करणार असेल तर सरकार कुणाला रोखणार नाही. मात्र गणेशोत्सव हा हिंदुंचा सण आहे. त्यामधे कुणी विघ्न आणू नये. आम्हाला हा विश्वास आहे की आंदोलक या सणाच्या आनंदात खोडा घालणार नाही. कारण आम्ही सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत.
Bombay High Court prohibits Manoj Jarange from fasting at Azad Maidan
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला