विशेष प्रतिनिधी
गेवराई : बीड जिल्ह्यातील गेवराई येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडितांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला हाेता. दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर चपला फेकल्या हाेत्या. याप्रकरणी पाेलीसांनी लक्ष्मण हाकेंसह 14 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
आमदार विजयसिंह पंडितांनी ‘चलो मुंबई’ असे बॅनर लावल्याने लक्ष्मण हाके यांच्याकडून वादग्रस्त विधान करण्यात आले होते. त्यानंतर लक्ष्मण हाके हे गेवराई येथे येताच विजयसिंह पंडितांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत हाकेंच्या कार्यकर्त्यांवर चपला फेकल्या. तसेच हाकेंच्या कार्यकर्त्यांनी देखील त्याला प्रत्युत्तर दिले. यावेळी पोलिसांनी दोन्हीकडील कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.
लक्ष्मण हाके यांची गाडी गेवराई येथे येताच विजयसिंह पंडितांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी लक्ष्मण हाके यांनी देखील गाडीवर चढत पंडितांच्या कार्यकर्त्यांना आव्हान दिले. दोन्हीकडील कार्यकर्ते आक्रमक झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी वाहतूक कोंडी देखील झाली. पोलिसांनी वेळीच धाव घेत कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर लक्ष्मण हाके यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, ओबीसी समाजाच्या बांधवांच्या मनात ऊर्जा निर्माण झाली पाहिजे. कोणाच्याही दहशतीखाली आम्ही राहणारे नाही आहोत. यावेळी बोलताना हाके यांनी शिवीगाळ करत म्हटले की तुमचं माणूस मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ करतो. आम्ही सुद्धा मर्दाची औलाद आहोत. तुझ्या गावात आलो आहे 500 किमी अंतरावर. तुझ्यात दम असेल तर ये, असे म्हणत हाके यांनी मनोज जरांगे यांना आव्हान दिले.
लक्ष्मण हाके हे समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत, असा आरोप करून विजयसिंह पंडित म्हणाले, त्यांचे हे काम मागच्या चार दिवसांपासून बीडमध्ये चालू होते. तीन-चार दिवसांपूर्वी त्यांनी माझ्या विरोधात अतिशय खालच्या स्तराची भाषा वापरली. दंडुक्याने मारेल, असे वक्तव्य केले. त्यांच्या या प्रतिक्रियेवर मी कुठेही भूमिका मांडली नाही. पण परत परत चिथावणीखोर वक्तव्य करायचे. आता आमचे समर्थक आणि सहाकरी यांची ही प्रतिक्रिया आहे. माझ्या समर्थकांनी त्या भागात जरांगे पाटील यांच्या आंदोलना संदर्भात बॅनर लावले असतील तर समाजासमाजात तेढ निर्माण होण्याचा काय प्रश्न आहे?
Case registered against 14 people including OBC leader Laxman Haake, action taken in Gevrai Rada case
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला