विशेष प्रतिनिधी
जालना : Manoj Jarange मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे यांना पूर्वपरवानगीशिवाय आझाद मैदान येथे आंदोलन करण्यास मनाई केली आहे. मात्र, आझाद मैदान काही नाही? आम्ही मुंबईत जाणारच, आमचे वकील कोर्टात जाणार आहेत, असा ठाम निर्धार मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे.Manoj Jarange
एका जनहित याचिकेवर मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्या. संदीप मार्ने यांनी हा निर्णय दिला. मनोज जरांगे म्हणाले की मा. न्यायदेवता तसं म्हणत असेल जर खारघर, नवी मुंबईत परवानगी देता येते तर आझाद मैदानावर आंदोलन करण्यास अडचण काय आहे? आम्ही न्यायदेवतेचा सन्मान करणारे लोक आहेत. आम्ही रितसर मार्गानं, संविधानाच्या मार्गानं अर्ज केलेले आहेत.न्यायदेवता 100 टक्के परवानगी देणार म्हणजे देणार, असं मनोज जरांगे म्हणाले. गरीब लोकांच्या वेदना आहेत, गरीब लोकांच्या अडचणी आहेत. कायदा जनतेसाठी आहेत, जनतेचं गाऱ्हाणं ऐकून घेणं सरकारचं, न्यायदेवतेनं ऐकून घ्यावं, आमच्या वकिलांच्याकडून न्यायदेवतेसमोर आमची बाजू मांडली जाणार आहे. न्यायदेवता 100 टक्के आम्हाला न्याय देणार, लोकशाही मार्गानं केलं जाणारं आंदोलन रोखता येणार नाही.Manoj Jarange
इंग्रजांच्या काळात देखील असं झालं नव्हतं, लोकशाही मार्गानं उपोषण झालेली आहेत. लोकशाही मार्गानं आंदोलन करणार आहोत. न्यायव्यवस्था आम्हाला 100 टक्के परवानगी देणार, आम्ही शांततेत आमरण उपोषण करणार आहोत. गेल्या वेळी देखील आम्हाला असंच केलं होतं. हे काय नवीन नाही, आम्ही मुंबईत जाणार आहे,असं मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे म्हणाले, मा. न्यायदेवतेने तरी आम्हाला न्याय दिला पाहिजे. संविधानाच्या मार्गानं, शांततेच्या मार्गानं, एक नियम न डावलता निघणार, आमचे वकील न्यायालयात जातील, आझाद मैदान का नाही? न्यायालयानं यापूर्वी या ठिकाणी राज्यातील जनता नियमांचं पालन करत आंदोलन करु शकते असं सांगितलेलं आहे. न्यायदेवतेनं तिथं आंदोलन करु शकतात हे सांगितलं आहे तिथं चाललो आहे. न्यायालयाच्या प्रक्रियेवर मला काही बोलायचं नाही. आमचे वकील कोर्टात जातील, न्यायदेवता आमच्यावर अन्याय करणार नाही.
The God of Justice will not do injustice, he will go to Mumbai: Manoj Jarange’s determination
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला