विशेष प्रतिनिधि
मुंबई : गणेशोत्सव अगदी जवळ आलेला असतांना मनोज जरांगे चांगलेच आक्रमक झालेत, अन् त्यांनी मुंबईच्या दिशेने मोर्चा घेऊन जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चा थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु केले अन् यासाठी त्यांनी आपले विशेष कार्यकारी अधिकारी राजेंद्र साबळे यांना जरांगेंच्या भेटीला पाठवलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांचे OSD राजेंद्र साबळे यांच्या नावाची चांगलीच चर्चा होत आहे. Devendra Fadnavis
याआधीही ‘OSD मंगेश चीवटे’ यांनी पार पडली होती महत्वाची जबाबदारी !
२०२३ च्या सप्टेंबर महिन्यात मनोज जरांगे यांनी पहिल्यांदाच मराठा आरक्षणाबाबत आक्रमक पवित्रा घेतला होता. तेव्हा त्यांनी मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचं आश्वासन दिल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, असा इशारा दिला अन् राज्यातील विविध पक्षांचे नेते आंतरवालीच्या दिशेने जाऊ लागले. मात्र तरीही जरांगे उपोषण सोडायला तयार नव्हते. तेव्हा देखील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे तत्कालीन OSD मंगेश चीवटे यांना जरांगे पाटलांकडे बोलणी करण्यासाठी पाठवले होते. मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी आपल्या भेटीला आले, म्हणून जरांगेंनी देखील मंगेश चिवटे यांचं म्हणण ऐकून घेत काही काळ उपोषण मागे घेतलं होतं. Devendra Fadnavis
थोडक्यात राज्यात जिथे जिथे कठीण परिस्थिती उद्भवते आणि मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष हजेरी लावण्याची गरज निर्माण होते, मात्र वास्तवात ती गोष्ट शक्य होत नाही. तेव्हा अशा प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री आपल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवतात. आपल्या विशेष प्रतिनिधीच्या माध्यमातून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतात. मग ती अगदी पूर परिस्थिती असो, दरड कोसळण्याची घटना असो, वा अशाच प्रकारचं एखादं आंदोलन. हे मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सरकारचं प्रतिनिधित्व करत त्या ठिकाणी जातात आणि परिस्थिती आटोक्यात येण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करतात.
OSD नेमके असतात तरी कोण?
एका शासकीय माजी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार १९९५ पासून Officer on Special Duty (OSD) हे पद जन्माला आलं. म्हणजेच अंदाजे २५ ते ३० वर्षांपूर्वी हे पद तयार झालं. मंत्रालयाच्या धोरणात्मक प्रकल्पांवर लक्ष देणं OSD चं मुख्य काम असतं. म्हणूनच OSD ला सरकारी अधिकाऱ्याचा किंवा उच्च अधिकाऱ्याचा दर्जा दिला जातो. तसंच एखाद्या मंत्रालय किंवा विभागाच्या विशिष्ट कार्यांसाठी सहाय्य करणे. मंत्रालयाच्या किंवा एखाद्या विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांना योग्य तो सल्ला देणे , मार्गदर्शन करणे , हे OSD चं काम असते. शिवाय जेव्हा राज्यात काही असाधारण प्रकल्प राबविले जातात. तेव्हा हे विशेष कार्यकारी अधिकारीच त्या प्रकल्पांची देखरेख करतात आणि त्या प्रकल्पांची प्रशासनिक प्रक्रिया करून घेतात. Devendra Fadnavis
OSD ची निवड कशी केली जाते?
तसंच काही वेळा मंत्र्यांची, तर काही वेळा विशिष्ठ विभागातील तज्ञांची OSD म्हणून नियुक्ती केली जाते. म्हणजेच कधी तंत्रज्ञान, विज्ञान, अर्थशास्त्रासंबंधीत तज्ञ अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते, तर कधी कृषी, आरोग्य, सामाजिक न्याय अशा विविध क्षेत्रातील लोकांना देखील विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमलं जातं. जेणेकरून ते अधिकारी त्या त्या विषयासंबंधित सर्व समस्या, योजना अन् प्रकल्पांची यशस्वीपणे अंमलबजावणी करू शकतात. म्हणूनच संबंधित OSD वर संबंधित मंत्र्यांच्या सर्व फाईल्सची जवाबदारी सोपवली जाते.
संबंधित खात्यातील सर्व कायदेशीर प्रक्रिया, व्यवहार, प्रकल्प यांची कागदोपत्री जबाबदारी सांभाळणे. तसंच सामान्य लोकांची कामं एक दुवा बनून संबंधित मंत्र्यांपर्यंत पोहोचवणे आणि मंत्र्यांनी राबविलेल्या योजना अन् प्रकल्पांवर विशेष देखरेख करण हे OSD चं काम असतं. म्हणूनच या OSD ना त्या त्या मंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून ओळखलं जातं. त्याच प्रमाणे आता जरांगे पाटील आक्रमक झाले. तेव्हा सरकारमधील आणि जरांगे पाटलांमधील दुवा बनून राजेंद्र साबळे यांनी त्यांची भेट घेतली अन् सरकारची भूमिका स्पष्ट केली. Devendra Fadnavis
What is the role of the OSD sent by Devendra Fadnavis to discuss with the Jarange?
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला