Pinaki Mishra पिनाकी मिश्रा यांच्यावर गंभीर आरोप, आर्थिक गैरव्यवहार, मनी लॉण्डरिंग व भारताच्या संरक्षण विषयांवर रशियाविरोधी प्रश्न विचारल्याचा आरोप

Pinaki Mishra पिनाकी मिश्रा यांच्यावर गंभीर आरोप, आर्थिक गैरव्यवहार, मनी लॉण्डरिंग व भारताच्या संरक्षण विषयांवर रशियाविरोधी प्रश्न विचारल्याचा आरोप

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : माजी खासदार व वरिष्ठ वकील पिनाकी मिश्रा यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहार, मनी लॉण्डरिंग आणि संसदेत भारताच्या संरक्षण विषयांवर संवेदनशील प्रश्न उपस्थित करून राष्ट्रीय सुरक्षेला धक्का दिल्याचे गंभीर आरोप झाले आहेत. बीजू जनता दलाचे नेते असलेल्या मिश्रा यांनी नुकताच तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्याशी विवाह केला आहे. Pinaki Mishra

२५ ऑगस्ट रोजी गृहमंत्रालय आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) येथे दाखल झालेल्या दोन तक्रारींमध्ये हे आरोप करण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांनी त्या स्वीकारल्या आहेत. एका तक्रारीत मिश्रा यांच्या मालमत्ता खरेदी आणि आर्थिक व्यवहारांतील अनियमितता नमूद केली आहे, तर दुसऱ्या तक्रारीत संसदेत त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचा उल्लेख आहे. या प्रश्नांमध्ये भारताच्या अणु पाणबुड्या, क्षेपणास्त्र प्रणाली आणि महत्वाच्या संरक्षण करारांबाबत तपशीलवार चौकशी करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.


एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा


तक्रारीत मिश्रा यांच्या मालमत्ता खरेदीच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. दिल्लीतील गोल्फ लिंक आणि जोर बाग येथील दोन महागड्या मालमत्ता मिश्रा यांनी थेट खरेदी न करता कंपन्यांच्या शेअर्सच्या स्वरूपात घेतल्याचे आरोप आहेत. यामुळे विक्री दस्तऐवजांवर थेट नाव नोंदविण्याऐवजी कंपनी हस्तांतरणाच्या माध्यमातून व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय, हाँगकाँगमधील एका व्यक्तीकडून मिश्रा यांच्या माजी पत्नी संगीता मिश्रा यांच्या खात्यावर आलेल्या ३,०५,००० अमेरिकी डॉलरच्या रकमेबाबतही संशय व्यक्त करण्यात आला आहे. “प्रेम व आपुलकीतून दिलेली भेट” असे या रकमेचे स्पष्टीकरण दिले गेले असले तरी तक्रारदाराने हे अत्यंत संशयास्पद असल्याचे म्हटले आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार हे केवळ तांत्रिक त्रुटी किंवा नोंदवहीतील चुका नसून खऱ्या निधीच्या स्त्रोताबाबत गंभीर तपासाची गरज असल्याचे स्पष्ट होते.

Pinaki Mishra faces serious charges of financial irregularities

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023