विशेष प्रतिनिधी
मुंबई : माझा पक्ष फोडला, चोरला. त्यांच्यासमोर उभे राहून माझे जे लोक निवडून आले तेही त्यांना पाहिजे आहेत, या विनंतीला काय अर्थ आहे, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांना फाेन केला हाेता. सी.पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे मतदार आहेत, त्यामुळे मराठी अस्मिता मानणाऱ्या पक्षांनी त्यांना मतदान करावे, अशी विनंती केली हाेती. यावर ठाकरे म्हणाले, सी.पी. राधाकृष्णन यांचे महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये नाव आहे का हे बघावे लागेल. त्यांना पाठिंबा देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन केला होता या गोष्टीमध्ये तथ्य आहे. पण आश्चर्य वाटले त्यांनी माझा पक्ष फोडला, चोरला. या विनंतीला काय अर्थ आहे? Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे म्हणाले की, राष्ट्रपतिपदाची निवडणूक होती तेव्हा मी न मागता त्यांना मतदान केले होते. मला कुणीही विनंती केली नव्हती. पण त्यानंतर साधे आभार मानायला फोन केला नाही.ग रज असेल तेव्हा वापरा आणि नसेल तेव्हा फेकून द्या ह्या पद्धतीला आपल्याला नाकारले पाहिजे. निवडणुकीत चमत्कार होईल अशी आम्हाला आशा आहे. देवेंद्र फडणवीस यांना फोन करून रेड्डी यांना पाठिंबा देण्याची विनंती करणार आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्या देशाचे उपराष्ट्रपती धनखड यांनी अचानक पदाचा राजीनामा दिला आणि ते गायब झाले. त्यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक होत आहे. इंडिया आघाडी म्हणून एकजुटीने आपण ही निवडणूक लढवत आहोत. आमच्या आघाडीकडून सुदर्शन रेड्डी हे आमचे उमेदवार आहेत. त्यांनी संविधानाच्या चौकटीत राहून काम केले आहे. संविधानाचे शपथ घेऊन न्याय बुद्धीने वागणारे उपराष्ट्रपती आपल्याला हवे आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले की, देशातील लोकशाही वाचवण्यासाठी एकजुटीने जे प्रयत्न करत आहोत तिला अधिक बळकटी देण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत आहोत. आम्ही मविआ म्हणून आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. ज्यांचे आपल्या देशावर प्रेम आहे त्यांनी चांगले उपराष्ट्रपती म्हणून सुदर्शन रेड्डी यांना निवडून देतील.
उद्धव ठाकरे म्हणाले की, इंडिया आघाडीकडे उपराष्ट्रपती पदासाठी आवश्यक संख्याबळ नाही. आपला देश एका विचित्र परिस्थितीमध्ये नेला जात आहे. ते जर आपल्याला थोपवता आले तर आपल्या देशाची लोकशाही वाचेल.150 वर्षांनंतर ज्या गुलामगिरीतून आपली सुटका झाली तिकडे आपला देश पुन्हा जाणार नाही. संख्याबळावर निवडणूक अवलंबून असती तर ती घेण्याचे काही कारणच नव्हते.मतदानामध्ये गोपनीयता आहे, त्यामुळे देशप्रेम असलेले एनडीएचे मतदार सुद्धा रेड्डी यांना मतदान करु शकतात.
सुदर्शन रेड्डी म्हणाले की, मी विरोधी पक्षाकडून उपराष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी मातोश्रीवर आलो आहे. त्यांनी मला यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला आहे. त्याच्या साथीशिवाय हे होणं शक्य नव्हते हे मला माहिती आहे. मातोश्रीवर आल्यावर लक्षात आले की देश हिताचे आणि महाराष्ट्र हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय या ठिकाणी झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे आलो आहे. मी कोणत्याही पक्षाशी निगडीत नसल्याने मी सर्व पक्षांना पाठिंबा मागू शकतो.
You broke my party, stole from it and are asking me for support, asks Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- किती माजलाय तो जरांग्या, भाषा मग्रुरीची : गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबाेल
- मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
- न्यायदेवता अन्याय करणार नाही, मुंबईत जाणारच : मनाेज जरांगेंचा निर्धार
- एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा