Devendra Fadvanis काही लोकांमुळे आंदोलनाला गालबोट, आडमुठेपणाने वागू नये, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Devendra Fadvanis काही लोकांमुळे आंदोलनाला गालबोट, आडमुठेपणाने वागू नये, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मराठा समाजाच्या मागण्यांबाबत आमचे सरकार सकारात्मक आहोत. सरकारची सहकार्याची भूमिका आहे. काही लोकांमुळे आंदोलनाला गालबोट लागते. कोणीही आडमुठेपणाने वागू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. Devendra Fadvanis

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबद्दल विचारले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आज सकाळी आंदोलक मुंबईत आले असून मनोज जरांगे पाटील उपोषणासाठी बसले आहेत. मुंबईत काही ठिकाणी रास्ता रोको करण्याचे प्रकार घडले. पण, पोलिसांनी समजूत घातल्यानंतर आंदोलक बाजूला झाले. जरांगे पाटील यांनीही शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. शासनाचीही सहकार्याची भूमिका आहे. लोकशाही पद्धतीने आंदोलन होत असेल तर त्याला कुठलीच मनाई नाही.



मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनावरून याआधी मोठा वाद रंगला होता. बऱ्याच कालावधीनतंर त्यांना मुंबईत आंदोलन करण्याची एक दिवसाची परवानगी देण्यात आली होती. अशामध्ये मुख्यमंत्र्यांना हे आंदोलन आणखी किती दिवस चालणार? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, आंदोलनाला एक दिवसाची परवानगी मिळाली होती. पण, त्यांनी पुन्हा परवानगी मागितली. कायद्याच्या चौकटीत राहून उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पोलीस पालन करणार आहेत. आंदोलनकर्ते आणि प्रशासन यांच्यातील हा प्रश्न आहे.

उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत, त्यानुसार सरकार सर्व काही मदत देण्यात येईल. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक आल्यानंतर काही प्रमाणात अडथळा निर्माण होतो, तो वाहतुकीला होताना दिसत आहे. काही लोकच अतिउत्साही पद्धतीने वागतात, त्यामुळे संपूर्ण आंदोलनाला गालबोट लागते. पण अशाप्रकारे कोणी वागू नये, याकडे लक्ष द्यावे लागेल. मनोज जरांगे पाटील यांनीही अलोकतांत्रिक आणि आडमुठे पद्धतीने वागू नये, असे आवाहन केलेले आहे”, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Devendra Fadvanis appeals that the protest should not be ignored or acted in an obstinate manner because of a few people.

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023