विशेष प्रतिनिधि
पुणे : पुण्याजवळील बहुप्रतीक्षित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी होत असणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेला आता गती मिळाली आहे. जवळपास निम्म्या बाधित शेतकऱ्यांनी मोहिमेच्या पहिल्याच आठवड्यात त्यांची जमीन देण्यास सहमति दर्शवली आहे. Purandar International Airport
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सांगितले की, सुधारित प्रकल्पानुसार एकूण ३,००० एकर मधील सुमारे १,४५० एकर जमीन व्यापणाऱ्या मालकांनी संमती पत्रे सादर केली आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सात गावांमधील १,००० हून अधिक शेतकऱ्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि सासवड उपविभागीय कार्यालयात त्यांची मंजूरी दिली आहे.
या प्रकल्पाला याआधी, विशेषतः पारगाव गावातून तीव्र विरोध झाला होता. मात्र, यावेळी हा प्रकल्प अत्यंत सुरळीत सहभागाने पुढे जात असल्याचं दिसून येत आहे. या प्रकल्पासाठी सहकार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासन एक विशेष भरपाई पॅकेज देणार आहे. ज्यामध्ये आर्थिक देयके असतील. तसेच, ज्यांची घरे घेतली जातील, त्यांना एरोसिटीमध्ये २५० चौरस मीटर निवासी भूखंड मोबदला दराने देण्यात येईल. Purandar International Airport
केवळ इतकेच नाही तर, शेतकऱ्यांना बाजारभवाच्या चारपट मोबदला देण्यात येणार आहे. संपादित केलेल्या जमिनीच्या दहा टक्के विकसित भूखंड देण्यात येईल. एरोसिटीतील भूखंडाचे मूल्य हे जवळपास एक ते दोन कोटी इतके होणार असल्याने, शेतकऱ्यांना याचा चांगलाच फायदा होणार आहे. संपादित घरात जर जास्ती कुटुंबे राहत असतील, तर त्यांची कागदपत्रे तपासून त्याप्रमाणे त्यांना स्वतंत्र भूखंड देण्यात येतील. Purandar International Airport
तसेच, भूमीहीन झालेल्या प्रकल्पग्रस्तांना २५ महिन्याची किमान कृषि मजुरी, तर अल्पभूधारकांना १८ महिन्यांची किमान कृषि मजुरी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने विमानतळ प्रकल्पात नोकरी देण्याचे आदेश देण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली.
जे शेतकरी जमीन देण्यास तयार आहेत त्यांना संमतीपत्र जमा करण्यासाठी १८ सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. जेणेकरून अधिकाधिक शेतकरी संमतीपत्र घेऊन पुढे येतील.
Farmers show readiness for land acquisition for Purandar International Airport
महत्वाच्या बातम्या
- Rahul Gandhi मतचोरीच्या ‘अणुबॉम्ब ‘नंतर आता ‘हायड्रोजन बॉम्ब’ टाकू , राहुल गांधी यांचा इशारा
- Chhagan Bhujbal जरांगे यांच्या विरोधात छगन भुजबळ आक्रमक, ओबीसीतून मराठा आरक्षण विरोधासाठी मुंबईवर धडक
- ओबीसी कोट्यातून आरक्षणास ‘एसईबीसी’चा अडथळा, मराठा समाजाची दोन्ही आरक्षणे जाण्याची भीती
- Politicians during Ganesh Festival : गणपती बाप्पाच्या दर्शनात राजकारण्यांची मांदियाळी!