Sanjay Raut : ‘आमची 15 मतं अवैध ठरवली…..’; राऊतांना हा पराभवही पचवता येईना

Sanjay Raut : ‘आमची 15 मतं अवैध ठरवली…..’; राऊतांना हा पराभवही पचवता येईना

Sanjay Raut

विशेष प्रतिनिधी 

मुंबई :  Sanjay Raut उपराष्ट्रपती पदाची निवडणूक काल (ता.९) मंगळवारी पार पडली. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन हे विजयी झाले. तर इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना हार पत्करावी लागली. मात्र लोकसभा आणि राज्यसभेप्रमाणे इंडिया आघाडीला हा पराभवही पचवता येत नसल्याचं दिसतंय. Sanjay Raut

सी. पी. राधाकृष्णन यांना एकूण ४५२ मतं तर सुदर्शन रेड्डी यांना एकूण ३०० मतं मिळाली. इंडिया आघाडीकडे एकूण ३१५ मतं होती. मात्र, या प्रक्रियेत एकूण १५ मतं अवैध ठरवली गेली. त्यामुळे, आता विरोधकांनी ही आमचीच मते बाद ठरवली असा आरोप केला आहे.



काय आहे राऊतांचा आरोप?

सुदर्शन रेड्डी यांच्या परभवानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘आमच्या उमेदवाराला ३०० मतं मिळाली, विरोधी पक्षाची ताकद ही साधारण ३१४ मतांची होती. यातील इंडिया आघाडीला मिळणारी ३१५ मतं अवैध ठरवण्यात आली. शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी कोणाचे असतात हे आपल्याला माहितीच आहे. जसे महाराष्ट्रातल्या निवडणुकीत झाले तसे तिकडे पण होऊ शकते.’ असं म्हणत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. Sanjay Raut

केवळ हेच नाही तर ‘पूर्व राष्ट्रपती जगदीप धनखड यांना केंद्र सरकारने कुठे डांबून ठेवले आहे? हे शोधण्याची जबाबदारी आम्ही नवीन राष्ट्रपतींवर सोपवणार आहोत,’ असं संजय राऊत म्हणाले. ‘राज्यसभा सुरू झाल्यावर आम्ही हा मुद्दा उपस्थित करू. जोपर्यंत त्यांचे सार्वजनिक दर्शन होत नाही आणि त्यांना इतके दिवस कुठे डांबून ठेवले होते हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत ते गायब आहेत, असेच आम्ही गृहीत धरू,’ असं देखील ते पुढे म्हटले.

राऊत यांच्या आरोपांमध्ये कितपत तथ्य?

जरी विरोधकांच्या म्हणण्याप्रमणे ही मतं इंडिया आघाडीचीच असली तरी रेड्डी यांना ३१२ मतं मिळणे अपेक्षित होते. कारण आम आदमी पक्षाची ‘१२’ मते देखील रेड्डी यांनाच जाणे अपेक्षित होते. याचाच अर्थ ‘आप’ची सर्व मते ही ‘एनडीए’च्या उमेदवाराला गेली आहेत किंवा इंडिया आघाडीची मते फुटली आहेत. मात्र इंडिया आघाडीतील नेत्यांसोबतच आता ‘मविआ’तिल नेत्यांनाही हा पराभव पचवता येत नाहीये. Sanjay Raut

त्यामुळेच संजय राऊत पुन्हा एकदा तीच मतचोरीची रंजक कथा ऐकवत आहेत. पराभव झाल्यानंतर विरोधी पक्षाने सरकारवर खापर फोडणे आता काही नवीन राहिले नाही. मात्र, इंडिया आघाडीची मतं फुटली आहेत हे आता स्पष्ट आहे. तरी देखील विरोधी पक्षनेते स्वतःच्या पक्षातील त्रुटींकडे लक्ष देण्याऐवजी, अजूनही सरकारला दोष देण्यातच व्यस्त आहेत. Sanjay Raut

‘Our 15 votes were declared invalid…..’; Sanjay Raut cannot even digest this defeat

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023