Deepak Kesarkar : मातोश्री बाहेर पडले चांगली गोष्ट, दीपक केसरकर यांचा उद्धव ठाकरेंना टोला

Deepak Kesarkar : मातोश्री बाहेर पडले चांगली गोष्ट, दीपक केसरकर यांचा उद्धव ठाकरेंना टोला

Deepak Kesarkar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Deepak Kesarkar  उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंच्या वरचेवर भेटी वाढल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे पुन्हा शिवतीर्थ येथे येऊन गेले. तब्बल अडीच तास ठाकरे बंधूंमध्ये यावेळी चर्चा झाली. यावरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.Deepak Kesarkar

शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्रिकरणावर म्हणाले की, मनसेने यापूर्वी बिनशर्त पाठिंबा दिला होता, मात्र तो त्यांनी स्वीकारला नव्हता. आज त्यांना गरज आहे. उद्धव ठाकरे यांना सध्या मदतीची गरज आहे. त्यासाठीच ते राज ठाकरे यांच्या मनसेकडे गेले. ते मातोश्री बाहेर पडले, इतरांना भेटत आहेत, ही चांगली गोष्ट आहे, फक्त त्यांनी स्वीकारलेला बदल जनतेने समजून घ्यावा.Deepak Kesarkar



आगामी मुंबई महापालिका निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंची युती होणार अशी चर्चा आता राजकीय वर्तूळात आहे. नाशिकमध्ये निघालेल्या मोर्चात ठाकरेंची शिवसेना आणि राज यांचे मनसैनिक खांद्याला खांदा लावून सहभागी झाले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संयुक्तपणे आज नाशिकमध्ये जनआक्रोश मोर्चा काढला. या मोर्चामध्ये मनसे नेते बाळा नांदगावकर, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बाळा नांदगावकर हे संजय राऊतांच्या खांद्याला खांदा लावून या मोर्चात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी संजय राऊत यांनी जनतेशी संवाद साधताना ठाकरे गट आणि मनसे हे फक्त नाशिकमध्येच नव्हे तर महाराष्ट्रातही प्रत्येक कार्यक्रम संयुक्तच होणार असल्याचे विधान केले. त्यामुळे आगामी निवडणुकींमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसे हे एकत्र लढणार असल्याचे संकेत दिले आहेत.

ठाकरेंच्या शिवसेनेचा येत्या 2 ऑक्टोबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला राज ठाकरे यांनी उपस्थित राहावे की नाही, यासाठी परवाच्या भेटीत चर्चा झाल्याची माहिती आहे. दोन्ही बंधूंनी एकत्र येण्यासाठी आणखी एक पाऊल यानिमित्ताने उचलले आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसोबतच ठाणे, पुणे, नाशिक येथेही त्यांची युती होणार असल्याची शक्यता आहे. दोन्ही शिवसेना (ठाकरे) आणि मनसे एकत्र आले तर जागा वाटपाचा फॉर्म्यूला कसा असला पाहिजे, यासर्व बाबांवर सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जाते.

“Good That Matoshree Stepped Out, Says Deepak Kesarkar in Jibe at Uddhav Thackeray”

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023