विशेष प्रतिनिधी
मुंबई : D. Shivanandan काही चार्टर्ड अकाउंटंट (सीए) आणि डॉक्टर मुंबईत अंडरवर्ल्डचा भाग होते. सीए काळा पैसा परदेशात नेण्यासाठी तर डॉक्टर उपचारासाठी मदत करायचे असा धक्कादायक दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डी. शिवानंद यांनी केला आहे.D. Shivanandan
डी. शिवानंदन मुंबई क्राईम ब्रँच प्रमुख असताना त्यांनी मुंबईतील अंडरवर्ल्डचे कंबरडे मोडले होते. निवृत्तीनंतर त्यांनी ‘द ब्रह्मास्त्र अनलीश्ड’ हे पुस्तक लिहिले असून या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले. यावेळी जे. रिबेरो, एम. एन. सिंग, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, सतीश सहानी आदी उपस्थित होते.D. Shivanandan
काही चार्टर्ड अकाउंटंट (CA) या संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा भाग बनले होते. काही सीए काळा पैसा देशात आणि परदेशात सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील होते. देशातून काळा पैसा बाहेर नेण्यासाठी ते मदत करायचे. हे काम अशा पद्धतीने करायचे की जेणेकरून पोलीस किंवा इतर तपास संस्था त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. काही सीएंप्रमाणे काही डॉक्टरही या टोळ्यांशी संबंधित होते. शूटर्सना प्रशिक्षण देण्यासाठी जुन्या आणि सोडून दिलेल्या गिरण्यांमध्ये किंवा शहराबाहेरील जंगलात छावण्या बांधण्यात आल्या होत्या. जर ऑपरेशन दरम्यान एखादा गुंड मारला गेला किंवा जखमी झाला तर उपचारासाठी आधीच डॉक्टरांची व्यवस्था केली जात असे.D. Shivanandan
डी. शिवानंदन यांनी ‘ पुस्तकात वेगवेगळ्या व्यवसायातील लोकांच्या भूमिकेबद्दल सविस्तर लिहिले आहे. यात अनेक गुंड गोळीबाराचा कट आखण्यापूर्वी ज्योतिष्यांशी सल्लामसलत करायचे, असा खळबळजनक दावाही करण्यात आला आहे. गुंड लोक गोळीबाराच्या तारखेबद्दल आणि वेळेबद्दल विशेष सावध होते. हल्ल्याचा कटात अडथळा येऊ नये, यावर त्यांचा भर असायचा. म्हणूनच ते ज्योतिष्यांचा सल्ला घ्यायचे, असं शिवानंदन यांनी पुस्तकात नमूद केले आहे. या पुस्तकात त्यांनी अंडरवर्ल्डच्या संपूर्ण कार्यपद्धतीबद्दल तपशीलवार लिहिले आहे.
संघटित गुन्हेगारी सिंडिकेटची रचना कॉर्पोरेट जगासारखी झाली होती. म्हणजे डॉनला एमडी किंवा अध्यक्ष म्हटले जायचे. त्याखालोखाल सीईओ असायचा. एखाद्या मोठ्या कामासाठी एमडी आणि सीईओ कामाचा प्लान तयार करायचे, असे शिवानंदन यांनी म्हटले आहे. प्लान यशस्वी करण्याची जबाबदारी सीईओची असायची आणि सीईओ एखादा जनरल मॅनेजर किंवा किंवा प्रोजक्ट मॅनेजरची नियुक्ती करायचा. हे सर्व टोळीचे विश्वासू सदस्य असत तसेच ते थेट सीईओच्या संपर्कात असायचे. विशेष म्हणजे शार्प शूटरची भरती करण्याचे काम जीएम किंवा प्रोजेक्ट मॅनेजर करायचे. त्यासाठी गुन्हेगारी जगात चांगले रेकॉर्ड असलेल्या शूटरचा ते शोध घ्यायचे. गोळीबार केल्यानंतर शूटर्सना सुरक्षित आणण्याची जबाबदारी जीएम किंवा प्रोजेक्ट मॅनेजरची असायची.
990 च्या दशकात मुंबईत गँगवॉर सुरू होते. तेव्हा मुंबईत गोळीबार करण्यासाठी उत्तर प्रदेश आणि बिहारमधून शूटर्स आणले जात होते. याचे मुख्य कारण म्हणजे या शूटर्सचा मुंबईसहा महाराष्ट्रातील कुठल्याही पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हेगारी रेकॉर्ड नव्हता. त्यामुळे, त्यांना ओळखणे पोलिसांसाठी शक्य होत नव्हते. शिवाय आर्थिकदृष्ट्या अंडरवर्ल्डच्या लोकांना हे परवडायचे कारण उत्तर प्रदेश, बिहारमधील शूटर्स कमी पैशात मोठी कामे करायला तयार असायचे, असे शिवानंद यांनी म्हटले आहे.
CA, doctor were also part of Mumbai underworld, claims D. Shivanandan’s book
महत्वाच्या बातम्या
- Yogesh Kadam : ठाकरे बंधुंचे मराठी मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरणार ; योगेश कदम
- round of 11th admission : अकरावी प्रवेशाची विशेष फेरी, चार महिन्यांनंतरही संपेना प्रवेश प्रक्रिया
- ward structure in Pune : पुण्यातील प्रभाग रचनेवर विरोधक व नागरिकांचा रोष !
- Manoj Jarange : ओबीसी समाजाला मिळाले दुष्ट विचारांचा नेता, मनोज जरांगे यांचा हल्लाबोल