विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी प्रभागरचनेवर नागरिकांचा आक्षेपाचा पाऊस पडला आहे. महापालिकेकडे तब्बल ५,९२२ हरकती दाखल झाल्या आहेत. यापैकी ८२८ हरकतदार सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहिले. नोंदीनुसार, प्रभाग क्रमांक ३ मध्ये ८१९, प्रभाग १५ मध्ये ५६४, तर प्रभाग ३४ मध्ये तब्बल २,१३७ हरकती दाखल झाल्या. या तिन्ही प्रभागांमध्ये सर्वाधिक नाराजी दिसून आली.
काही प्रभागांत आक्षेपांची संख्या नगण्य होती. प्रभाग २५, ३१ आणि ३५मध्ये फक्त एकेक हरकत दाखल झाली. सुनावणीसाठी हजेरीत प्रभाग २४ आघाडीवर राहिला. या प्रभागातून ८५ हरकतदार आले. त्याचबरोबर प्रभाग ३४मधून ७७ आणि प्रभाग ३८मधून ७६ हरकतदार उपस्थित राहिले. काही प्रभागांत पन्नासपेक्षा जास्त नागरिकांनी सामूहिकरीत्या हजेरी लावली.
महापालिकेच्या नोंदी सांगतात की अनेक हरकती सामाईक स्वरूपाच्या होत्या. म्हणजेच, एका प्रकारच्या तक्रारी गटागटाने सादर झाल्या. या सुनावणीनंतर प्रभागरचनेवरील अंतिम निर्णय निवडणूक विभाग घेणार असून त्यानंतरच निवडणुकीसाठी प्रभागांची अंतिम रूपरेषा ठरणार आहे.
प्रभाग रचना तयार करताना भौगोलिक आणि नैसर्गिक हद्दी ओलांडून प्रभागांची तोडफोड केली आहे. ही रचना केवळ भाजपच्या हिताची असल्याचा आरोप करुन संताप व्यक्त केला जात आहे. रचना करताना सामान्यनागरिकांचा तसेच उमेदवाराचा विचार करण्यात आला नाही. यावर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत, परंतु महापालिका प्रशासनाने तोंडावर पट्टी बांधली आहे.
Sharad Pawar : शरद पवारांचा ‘तो’ जीआर मराठ्यांसाठी ठरतोय अडचणीचा !
दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रभाग रचनेच्या प्रारुप आराखड्यावरील सुनावणींची औपचारिकता शुक्रवारी पूर्ण झाली. आता घेण्यात आलेल्या हरकतीनुसार प्रभाग रचनेत किती बदल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय संघर्ष पुढील काळात वाढत जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रभाग रचनेच्या प्रारुप आराखड्यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या.त्यावर गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अपर सचिव व्ही. राधा यांनी सुनावणी घेतली. सुनावणी नंतर त्या पत्रकारांशी संवाद साधणार असल्याचे सांगण्यात आले होते.मात्र त्या एकही शब्द न बोलता निघून गेल्या.
प्रभाग निहाय आलेल्या हरकतींवर सलग दोन सुनावणी झाली. यात ८२८ हरकतदारांनी प्रत्यक्ष सुनावणीत सहभाग घेतला. यामध्ये प्रामुख्याने प्रभागाच्या सीमा ठरविताना राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे पालन केले गेले नाही. भौगोलिक रचनेचा विचार केला गेला नाही अशा स्वरुपाच्या हरकतींचे यात प्रमाण अधिक होते. तसेच काही प्रभागांची रचना करताना एससी आरक्षण कायम राहणार नाही, यासाठी मतदार याद्यां फोडून त्या दुसऱ्या प्रभागाला जोडल्या गेल्या असा आरोपही काही हरकतदारांनी करीत जोरदार विरोध नोंदविला होता. प्रभाग रचना तयार करताना लोकसंख्या, प्रगणक गट आणि नैसर्गिक सीमांचा समतोल साधणे अवघड होत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.
गेल्या निवडणुकीच्यावेळी हरकतींवर झालेल्या सुनावणीनंतर साधारणपणे सहा टक्के बदल करीत, अंतिम रचना जाहीर केली गेली होती. यावर्षी हरकतींवरील सुनावणीची औपचारिकता आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे अंतिम रचना कशी असेल याविषयी उत्सुकता निर्माण झाली. सुनावणीची प्रक्रीया ही लोकशाहीतील महत्वाचा टप्पा असुन, यानंतर हरकतींचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर अंतिम रचना जाहीर केली
Rain of objections on ward structure in Pune, 5,922 objections; 828 people attended the hearing on pmc
महत्वाच्या बातम्या
- Yogesh Kadam : ठाकरे बंधुंचे मराठी मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरणार ; योगेश कदम
- round of 11th admission : अकरावी प्रवेशाची विशेष फेरी, चार महिन्यांनंतरही संपेना प्रवेश प्रक्रिया
- ward structure in Pune : पुण्यातील प्रभाग रचनेवर विरोधक व नागरिकांचा रोष !
- Manoj Jarange : ओबीसी समाजाला मिळाले दुष्ट विचारांचा नेता, मनोज जरांगे यांचा हल्लाबोल