विशेष प्रतिनिधी
पुणे : महापालिका प्रशासनाकडून प्रारूप प्रभाग रचनेसंबंधी हरकती व सूचनांचा अहवाल सोमवारी (दि. १५) राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे. तर, ३ ते ६ ऑक्टोबर या कालावधीत अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर तब्बल ५ हजार ९२२ इतक्या मोठ्या प्रमाणात हरकती व सूचना आल्या होत्या. त्यावर गुरुवारी (दि.११) व शुक्रवारी (दि.१२) सुनावणी घेण्यात आली. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या उपस्थितीत हरकती व सूचनांवर बालगंधर्व रंगमंदिर येथे सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीसाठी सव्वा आठशे हरकतदारांनी हजेरी लावली होती.
दरम्यान, आता महापालिका प्रशासनाकडून हरकती व सूचनांसंबंधीचा अहवाल तयार करण्यात येत आहे. हरकती व सूचनांची दखल घेऊन संबंधित अहवाल, राज्याच्या नगर विकास विभागाकडे सोमवारी पाठविला जाणार आहे. तर, नगरविकास विभागाकडून हा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे २२ सप्टेंबरला सुपुर्द केला जाणार आहे. त्यानंतर, पुढील आठवड्यात निवडणूक आयोगाकडून ३ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम प्रभाग रचना महापालिका आयुक्तांकडे सादर करणार आहे.
त्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे निवडणूक शाखेचे उपायुक्त प्रसाद काटकर यांनी दिली. नागरिकांनी केलेल्या हरकती व सूचनांची दखल घेऊन अंतिम प्रभाग रचनेमध्ये नेमका काय बदल करण्यात आला आहे, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Pune municipal corporation will send a report to the state government on Monday
महत्वाच्या बातम्या
- Yogesh Kadam : ठाकरे बंधुंचे मराठी मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरणार ; योगेश कदम
- round of 11th admission : अकरावी प्रवेशाची विशेष फेरी, चार महिन्यांनंतरही संपेना प्रवेश प्रक्रिया
- ward structure in Pune : पुण्यातील प्रभाग रचनेवर विरोधक व नागरिकांचा रोष !
- Manoj Jarange : ओबीसी समाजाला मिळाले दुष्ट विचारांचा नेता, मनोज जरांगे यांचा हल्लाबोल