विशेष प्रतिनिधी
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संबंधात कटुता आल्याची चर्चा सुरू आहे. मात्र या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी असल्याच्या चर्चांना फेटाळत आम्ही तिघेही समन्वयाने काम करत आहोत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. राज्याचा कारभार सुरळीत चालावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. हडपसर येथेजनसंवाद’या अभियानात नागरिकांच्या तक्रारी समजून घेत रस्ता, ड्रेनेज, लाईटची कामे मार्गी लावणार असल्याचा शब्द पवार यांनी दिला. Devendra Fadnavis
पवार म्हणाले, नागरीकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे, नागरीकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. सर्वांनी एकोप्याने राहून सण आनंदाने साजरा करावा आणि शहराचे वातावरण चांगले ठेवावे. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. सर्व अधिकारी उपस्थित असून त्यांचीही जबाबदारी ठरलेली आहे. नागरिकांची समस्या सोडवणे हेच आमचे प्राधान्य आहे. मी इथे सरकार म्हणूनच बसलेलो आहे .मी राष्ट्रवादीचा म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकत्याचीच नाही तर उपमुख्यमंञी म्हणून पालकमंत्री म्हणून सगळयांची कामे करण्यास बसलो आहे. त्यामुळे यातून कोणताही वेगळा अर्थ काढू नये .
कोमकर हत्या प्रकरणी त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. लहान वयातील मुलं गुन्ह्याकडे वळत असल्याने केंद्र सरकारने १८ आणि २१ वर्षांची वयोमर्यादा कमी करण्याचा विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली. आरोपींवर मोक्का लावण्यात आला असून कठोर कारवाई सुरू आहे. पोलिसांनी कोणताही राजकीय दबाव न घेता पारदर्शक तपास करावा, अशा सूचना दिल्या असल्याचे त्यांनी नमूद केले.
सातारा गॅझेट प्रकरणात कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, सर्वांनी बसून मार्ग काढला जाईल, असे पवार यांनी सांगितले.
महिला आयपीएस अधिकारी दमदाटी प्रकरणावर मात्र प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला.
हडपसर येथे “जनसंवाद” या अभियानाची सुरुवात अजित पवार यांनी केली. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिक थेट शासकीय यंत्रणेशी गेले असून यामध्ये व्हॉट्सअॅ चॅटबॉट्स, डिजिटल किऑस्क्स आणि मिस्ड कॉल क्रमांकासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला. पारदर्शक तक्रार निवारण प्रणालीमुळे शेकडो नागरिकांना त्यांच्या समस्या थेट अधिकाऱ्यांपर्यंत सहज पोहचवता आल्या. तक्रार नोंदवणे, अधिकारी वर्गाकडे पोहोचवणे, विभागीय समन्वयातून त्यावर तोडगा काढणे आणि नियमित फॉलो-अप अशी सुसज्ज यंत्रणा जनसंवाद या अभियानात राबविण्यात आली आहे.
या कार्यक्रमात ३० शासकीय विभाग सहभागी झाले होते. या ठिकाणी नागरिकांनी ४ हजारांहून अधिक तक्रारी मांडल्या, त्यापैकी १५०० पेक्षा अधिक तक्रारींचे निराकरण जागीच करण्यात आले. तक्रारींमध्ये पाणीपुरवठा आणि वाहतूक कोंडी संबंधित मुद्दे विशेषतः मोठ्या प्रमाणात नोंदविले गेले. हडपसरनंतर ही मोहीम राज्यभर राबविण्यात येणार असून, जनतेशी सातत्यपूर्ण संवाद राखत जबाबदार शासन निर्माण करण्यासाठी हा उपक्रमाचा फायदा होईल, असा दावा करण्यात आला आहे.
Devendra Fadnavis and Shinde, Ajit Pawar clarified
महत्वाच्या बातम्या
- Yogesh Kadam : ठाकरे बंधुंचे मराठी मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरणार ; योगेश कदम
- round of 11th admission : अकरावी प्रवेशाची विशेष फेरी, चार महिन्यांनंतरही संपेना प्रवेश प्रक्रिया
- ward structure in Pune : पुण्यातील प्रभाग रचनेवर विरोधक व नागरिकांचा रोष !
- Manoj Jarange : ओबीसी समाजाला मिळाले दुष्ट विचारांचा नेता, मनोज जरांगे यांचा हल्लाबोल