विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ashish Shelar सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले की, सरकार चित्रपटगृह परवाने, सुरक्षितता नियम आणि जुनाट कायदे बदलून सिनेउद्योगाच्या सध्याच्या गरजेनुसार धोरण आखण्याच्या तयारीत आहे.Ashish Shelar
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी महाराष्ट्रातील सिनेमांसंदर्भात एक महत्वाची घोषणा केलीय. ती घोषणा म्हणजे , “‘महाराष्ट्र सिनेमा ॲक्ट’मध्ये ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ या धर्तीवर सुधारणा करणार.” आता या घोषणेचा नेमका अर्थ काय? तो समजून घ्यायचा असेल तर आधी या दोन वेगवेगळ्या गोष्टी म्हणजेच महाराष्ट्र सिनेमा ॲक्ट आणि इज ऑफ डुईंग बिझनेस या दोन बाबी समजून घ्याव्या लागतील.Ashish Shelar
इज ऑफ डुईंग बिझनेस हा राज्यातील एक उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील व्यवसायात सुलभता आणणं, व्यवसायांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणं, नियामक सुधारणा आणणं यासाठी प्रयत्न केले जातात. सोप्या शब्दात सांगायचं तर, राज्यातील व्यवसाय वाढावे हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे.Ashish Shelar
राज्यातील सिनेमा नियंत्रित करणाऱ्या कायद्यामध्ये आता व्यवसाय वाढावे यासाठीच्या उपक्रमांनुसार सुधारणा करणार असल्याचं शेलारांनी म्हटलंय. “महाराष्ट्र सिनेमा ॲक्टमध्ये इज ऑफ डुईंग बिझनेस या धर्तीवर सुधारणा करण्याबाबत विभागाने केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावा. चित्रपटगृहांना परवाना देणे, त्यांचे नियमन करणे आणि त्यांच्या सुविधा व सुरक्षेसाठी कालबाह्य नियम बदलून काळानुरूप सिनेमा व्यवसायाच्या विकासानुरूप धोरण बनविण्यासाठी शासन सकारात्मक आहे.” असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.
त्यामुळे ‘महाराष्ट्र सिनेमा ॲक्ट’ आणि ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ या दोन्ही गोष्टींचा योग्य तो मेळ घातला गेल्यास राज्यातील सिनेमांसाठी, सिनेमा व्यवसायासाठी हा निर्णय गेम चेंजर ठरू शकेल.
Minister Ashish Shelar’s announcement gives new impetus to the cinema business in Maharashtra
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!