विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर : Devendra Fadnavis दुष्काळ हा मराठवाड्याच्या पाचवीला पुजला आहे. वर्षानुवर्षे दुष्काळाने होरपळणारा मराठवाडा आपण बघतोय. पण मराठवाड्याचा हा दुष्काळ आपल्याला भुतकाळ करायचा हा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. मराठवड्यात गेल्या दोन वर्षांत सात प्रकल्पांची घळभरणी केली. 38.48 दसलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा नव्याने निर्माण केला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. Devendra Fadnavis
मराठावाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, एकीकडे कृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाड्यात आणले. आता दुसऱ्या टप्प्यात सांगली आणि कोल्हापूरचे पुराचे पाणी उजनीपर्यंत आणून मराठवाड्यात आणणार आहोत. त्यासोबत उल्हास खोऱ्याचे 54 टीमसी पाणी हे देखील आपण मराठवाड्यात आणणार आहोत. Devendra Fadnavis
मराठवाड्यातील गोदावरीचे जे तुटीचे खोरे आहे, हे खोरे त्यातील तुट दूर करून यासंदर्भात प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हे पाणी पोहोचवण्याचे काम निश्चितपणे आपल्या सरकारच्या माध्यमातून केले जाईल. आता हे केवळ कागदावर राहिलेले नाही. याच्या सगळ्या मान्यता घेऊन त्याचा डीपीआर अंतिम टप्प्यात आहे. डिसेंबरपर्यंत याचा डीपीआर तयार होईल आणि त्यानंतर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये याचे टेंडर आम्ही काढू आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात पुढील सहा महिन्यांत करणार आहोत. त्यामुळे मराठवाड्यातील दुष्काळ हा भुतकाळ झाला पाहिजे, आपण हे स्वप्न पाहिले होते, त्यादृष्टीने आपण मोठ्या प्रमाणात काम सुरू केले आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
16 सप्टेंबर 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. घृष्णेश्वर मंदिर 61 कोटी रुपये दिले. तुळजाभवानी मंदिरासाठी 541 कोटी रुपयांची तरतूद केली. औंढा नागनाथ आराखड्याला मंजुरी दिली. मानव विकास कार्यक्रमांतर्गत 94 बसेस दिल्या. संभाजीनगरला जवळपास 115 बसेस दिल्या. 9 महामार्गावर आयटीएमएसच्या घेतलेल्या निर्णयासाठी त्याची जून महिन्यात वर्कऑर्डर दिली. 916 अंगणवाड्यांच सुरुवात केली. 26 हजार 500 नवीन बचत गट तयार करून, त्यामध्ये 2.70 लाख महिलांना जोडले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेच्या अंतर्गत 95 कोटींचा निधी वितरीत केला. विविध स्मारके आणि मंदिरांसाठी 253 कोटी रुपये दिले. 3 हजार 121 कोटींच्या रस्त्याची कामे सुरू केली असून, ती प्रगतीपथावर आहेत. 4 लाख सिंचन विहिरींपैकी जवळपास 30 हजार पूर्ण केल्या. 1.14 लाख सिंचन विहिरींची कामे आपण सुरू केली. Devendra Fadnavis
छत्रपती संभाजीनगर शहराच्या पिण्याच्या पाण्याकरिता 2700 कोटी रुपयांची योजना आपल्या सरकारने मंजून केली. महानगरपालिकेचा 800 कोटींचा हिस्सा देखील आपण भरण्याचा निर्णय घेतला. आता त्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. Devendra Fadnavis
Drought in Marathwada will be a thing of the past: Chief Minister Devendra Fadnavis assures
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!