विशेष प्रतिनिधी
हैद्राबाद : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केलेले तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंता रेड्डी भाजपच्या प्रेमात पडले आहेत. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाला मदत केली. Revanth Reddy
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजप नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने इंडिया आघाडीला धक्का दिला. सी.पी. राधाकृष्णन माेठ्या फरकाने उपराष्ट्रपती बनले, महाराष्ट्रासह इतर काही राज्यातील काँग्रेसच्या खासदारांनी एनडीएच्या उमेदवाराला मतदान केल्याचे म्हटले जात आहे. त्यामध्ये रेवंता रेड्डी यांनी माेठी भूमिका बजावली.
तेलंगणातील बीआरएसचे आमदार पडी कौशिक रेड्डी यांनी दावा केला आहे की, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आदेश दिल्यामुळे काँग्रेसच्या आठ खासदारांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केले. काँग्रेसच्या तीन खासदारांनी मला खासगीमध्ये सांगितले की, उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपला मतदान केलं. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या आदेशावरून त्यांनी क्रॉस व्होटिंग केलं. एक पत्रकार परिषद घ्या आणि हे सगळ्यांच्यासमोर मांडा असेही त्यांनी सांगितल्याचे आमदार कौशिक रेड्डी यांनी सांगितले.
आमदार रेड्डी म्हणाले, मी जेव्हा काँग्रेसमधील माझ्या काही मित्रांना कॉल केला, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले होते. विकल्या गेलेल्या खासदारांमध्ये तेलंगणातील 8 खासदारांचाही समावेश आहे.
संसदेच्या दोन्ही सभागृहातील ७८१ खासदार मतदान करण्यास पात्र होते. पण, त्यापैकी ७६७ खासदारांनी मतदान केले. मतमोजणीमध्ये ७५२ मतेच वैध ठरली होती. त्यापैकी ४५२ मते भाजपचे (एनडीए) सी.पी. राधाकृष्णन यांना मिळाली, तर बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली होती. इंडिया आघाडीचे ३१५ खासदार आहेत. त्यामुळे सुदर्शन रेड्डी यांना ३१५ मते मिळणे अपेक्षित होते. त्यानंतर निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्याचे समोर आले.
Revanth Reddy in love with BJP! Helped in the Vice Presidential election
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!