विशेष प्रतिनिधी
मुंबई : साहित्यिक आणि कलाकार भूमिका घेत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खडे बाेल सुनावले आहेत. आपले आजाेबा प्रबाेधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देत राज ठाकरे यांनी साहित्यिक, कलावंतांचे कान टाेचले आहेत. Raj Thackeray
प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी एक पोस्ट केली. आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्यासोबतचा जुना फोटो पोस्ट करत राज ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी म्हटले आहे श, आज आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती… आजोबांनी वक्तृत्व, लेखन आणि प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रं वापरून पुराणमतवाद्यांशी दोन हात केले. महात्मा ज्योतिबा फुलेंचं साहित्य हे आमच्या आजोबांचं प्रेरणास्रोत. यातूनच त्यांच्या समाजसुधारणेच्या कल्पना पुरेशा स्पष्ट झाल्या आणि त्यानंतर आजोबांनी सामाजिक कार्याचा पाया घातलाच, पण त्यात ढवळाढवळ करणाऱ्यांची पार दाणादाण उडवून दिली.
आज आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती… आजोबांनी वक्तृत्व, लेखन आणि प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रं वापरून पुराणमतवाद्यांशी दोन हात केले. महात्मा ज्योतिबा फुलेंचं साहित्य हे आमच्या आजोबांचं प्रेरणास्रोत. यातूनच त्यांच्या समाजसुधारणेच्या कल्पना पुरेशा स्पष्ट झाल्या आणि… pic.twitter.com/BHbTm1qeil
— Raj Thackeray (@RajThackeray) September 17, 2025
संयुक्त महाराष्ट्र चळ्वळीतलं त्यांचं योगदान अतुलनीय आहे. ही अशी एक चळवळ होती ज्यात संपूर्ण महाराष्ट्राची एकजूट दिसली, ती पक्षविरहित होती, विचारधारा विरहित होती, या सगळ्या शक्तींना एकत्र ठेवण्याचं काम आजोबांनी केले असे म्हणत राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, आजोबांचं एक पुस्तक आहे त्यांचं नाव आहे ‘देवांचा धर्म की धर्माची देवळे’.
आज आजोबा हयात असते तर धर्माच्या नावाखाली, उत्सवाच्या नावाखाली देवालाच ताब्यात घेण्याचे, त्याला पण आर्थिक महत्वकांक्षेच्या चौकटीत बसवण्याचे जे प्रयत्न सुरु आहेत ते पाहून, धर्माचा बाजार मांडणाऱ्या आणि त्याकडे डोळे मिटून बघणाऱ्या व्यवस्थेवर प्रहार केले असते.
आम्हा सर्व ठाकरे परिवाराला ओळख , ताकद, आणि विचारांची स्पष्टता मिळाली ती निव्वळ आजोबांमुळेच, अशा शब्दात राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरेंना अभिवादन केलं आहे.
Raj Thackeray’s words of caution to those who promote religion and literary figures who do not take a stand
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!