विशेष प्रतिनिधी
पुणे : Prakash Ambedkar गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील गुडलक चौकात संशोधक विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण सुरू आहे. आज (ता.१७) या आंदोलनाला प्रकाश आंबेडकर यांनी उपोषणाला भेट दिली व आंदोलक विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेतले.
गेल्या दोन दिवसांपासून बार्टी, सारथी आणि महाज्योती या तिन्ही संस्थांचे संशोधक विद्यार्थी एकत्रितपणे आंदोलन करत आहेत. २०२२ पासून बार्टीची तर २०२३ नंतर सारथी आणि महाज्योतीची पी.एच.डी फेलोशिप जाहिरात प्रसिद्धच झालेली नाही. याच कारणामुळे येथील विद्यार्थ्यानी विद्यार्थ्यांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला. Prakash Ambedkar
बुधवारी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी त्यांच्या प्रश्नांवर व त्यांना येत असणाऱ्या अडचणींवर चर्चा केली. दरम्यान सरकार सातत्याने संशोधक विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करत आहे, अशी तक्रार विद्यार्थीनी प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केली.
या भेटीदरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांचे प्रश ऐकून त्यांना विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन देखील केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आंदोलनाची जागा बदलण्याचे देखील आवाहन केले. ‘जर तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवायचे असतील तर पुण्यापेक्षा तुम्ही उपोषणाचे केंद्र मुंबई मंत्रालय करायला हवे. कारण आता नेपाळची परिस्थिति पाहून सरकारलाही भिती आहे,’ असा सल्ला आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. Prakash Ambedkar
तसेच फेलोशिप बद्दल बोलतांना आंबेडकर यांनी सरकारवर निशाणा साधला. सरकार मान्य झालेले बजेट वापरत नाही. मान्य झालेला निधी वेगवेगळ्या खात्यात चुकीच्या पद्धतीने वळवला जातो असा आरोप त्यांनी सरकारवर केला. तसेच विद्यार्थ्यांना दर महिन्याला फेलोशिप मिळायला हवी असे ठाम मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडले.
फेलोशिपची नवीन जाहिरात प्रसिद्ध होईल पर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही या निर्णयावर विद्यार्थी ठाम आहेत. आता आंबेडकर यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे विद्यार्थी आपलं मोर्चा मुंबई कडे वळवतील का? की त्या आधीच सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करेल हे पहाणं महत्त्वाच ठरेल. Prakash Ambedkar
Prakash Ambedkar visits PhD research students’ hunger strike; appeals to make Mumbai Mantralaya the centre of the hunger strike
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!