Ghayval gang : आंदेकर टोळीपाठोपाठ आता पुण्यात घायवळ टोळीचा धुमाकूळ !

Ghayval gang : आंदेकर टोळीपाठोपाठ आता पुण्यात घायवळ टोळीचा धुमाकूळ !

Ghayval gang

विशेष प्रतिनिधी 

पुणे : Ghayval gang गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला झालेली आयुष कोमकरच्या हत्येची धक्कादायक घटना पुणेकरांच्या मनात अजूनही ताजी आहे. अशातच, काल मध्यरात्री पुण्यातील कोथरूड परिसरात पुन्हा एक गोळीबाराची घटना घडली. या घटनेमुळे आता पुन्हा एकदा संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.



नेमकं काय घडलं?

प्राथमिक माहितीनुसार, हा गोळीबार कुख्यात गुंड निलेश घायवळच्या टोळीकडून झाल्याचं समोर आलं आहे. कोथरूडच्या शिंदे चाळ परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास मुठेश्वर मित्र मंडळासमोर ३६ वर्षीय प्रकाश धुमाळ आपल्या मित्रांसोबत बोलत उभे होते. तेव्हा ते बोलत असताना अचानक तिथे एक गाडी आली. त्यात कुख्यात गुंड निलेश घायवळच्या टोळीतले मयुर कुंभारे, मुसा शेख, रोहीत आखाड आणि गणेश राऊत हे चार जण होते. Ghayval gang

ज्यांनी “मला तू रस्ता का देत नाहीस ?”, असे म्हणत गाडीला साईड न दिल्याच्या कारणावरून गोळीबार केला. ज्यापैकी मयुर कुंभारेने थेट प्रकाश धुमाळच्या दिशेने गोळीबार केला आणि त्यांच्यावर निशाणा साधत तीन गोळ्या झाडल्या. यात धुमाळ यांच्या मानेला आणि मांडीला गोळी लागली व ते गंभीररित्या जखमी झाले. गोळ्या लागल्यानंतर प्रकाश धुमाळ जखमी अवस्थेत आपला जीव मुठीत घेऊन पळत सुटले. त्यामुळे घटनास्थळी त्यांच्या रक्ताचे ठसे दिसून आले.

त्यानंतर प्रकाश धुमाळ यांना कोथरूडच्या सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं, व त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरु झाले. पोलिसांनी लगेचच या प्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली. यात प्रकाश धुमाळ यांच्यावर गोळीबार करणारे मयुर कुंभारे आणि आनंद चांडलेकर या आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली तर यातील इतर आरोपी सध्या फरार झालेले आहेत. Ghayval gang

यात स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार काल मध्यरात्री ज्यांच्यावर गोळीबार झाला, त्या प्रकाश धुमाळ यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तरी देखील केवळ गाडीला रस्ता दिला नाही, या क्षुल्लक कारणावरुन ही घटना घडली. या छोट्या कारणावरून आक्रमक झालेल्या गुंडाच्या टोळीमुळे प्रकाश धुमाळ यांच्या जीवाला धोका निर्माण झाला.

हा गोळीबार करणारे गुंड हे निलेश घायवळच्या टोळीतले असल्याने याचं रुपांतर आता टोळीयुद्धात होतंय की काय? अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. तसेच या घटनेमुळे आता पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे, ही घटना जिथे घडली, त्या जागेपासून केवळ २०० मीटर अंतरावर कोथरूड पोलीस स्टेशन आहे. मात्र तरी देखील फायरिंग झाल्यानंतर पोलिसांना घटनास्थळी पोहोचायला अर्धा तास लागला आणि पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्न उपस्थित राहिले आहेत. Ghayval gang

यात स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत गोळीबार झालेले प्रकाश धुमाळ जर खरोखरच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नसतील. मात्र तरी देखील केवळ गाडीला साईड न दिल्याच्या रागातून एवढा गंभीर प्रकार घडत असेल आणि गुंडाची ही टोळी अशाप्रकारे सर्रासपणे गोळीबार करत असेल, तर ही बाब नक्कीच चिंताजनक आहे. तसंच या घटनेच्या आडून जर कुख्यात गुंड निलेश घायवळच्या टोळीचा धुमाकूळ वाढत असेल, तर ही पुणेकरांच्या दृष्टीने निश्चितच धोकादायक बाब आहे. त्यामुळेच आता हा प्रकार खरंच फक्त गाडीला साईड न दिल्याच्या रागातून घडला, की त्यामागे आणखी काही वेगळं कारण होतं? हे पोलीस तपासानंतर समोर येईलच. Ghayval gang

After the Andekar gang, now the Ghayval gang is making waves in Pune!

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023