Rahul Gandhi : ना अणुबाॅम्ब, ना हायड्राेजन बाॅम्ब , राहुल गांधी यांच्या निवडणूक आयाेगावर नव्याने फैरी पण जुनेच आराेप

Rahul Gandhi : ना अणुबाॅम्ब, ना हायड्राेजन बाॅम्ब , राहुल गांधी यांच्या निवडणूक आयाेगावर नव्याने फैरी पण जुनेच आराेप

Rahul Gandhi

Neither atomic bomb nor hydrogen bomb, new attack on Rahul Gandhi’s Election Commission but old allegations

 

 

विशेष प्रतिनिधी

 

नवी दिल्ली : Rahul Gandhi : काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा मतचाेरीचे आराेप केले आहेत. पुन्हा एकदा त्यांनी कर्नाटकातीलच एका विधानसभा मतदारसंघाचा संदर्भ देत या ठिकाणी 6,018 मते वगळण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयाेगावर अणुबाॅम्ब नव्हे तर हायड्राेजन बाॅम्ब टाकण्याचा दावा केला जात हाेता. पण हा बार फुसका ठरला आहे.

गेल्या महिन्यात राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत पत्रकार घेत आरोप केले होते की, अनेक मतदारांचा रहिवासी पत्ता शून्य किंवा न समजेल असा आहे. हा गोष्ट त्यांनी पुराव्यासह पत्रकार परिषदेत दाखवली होती. महाराष्ट्रातही अशा प्रकारे मतदार वाढवण्यात आल्याचा त्यांनी दावा केला होता. यानंतर आज राहुल गांधी यांनी कर्नाटकातील मतचोरीवर पत्रकार परिषद घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर राहुल गांधी यांनी आरोप केले आहेत.



राहुल गांधी म्हणाले की, कर्नाटकातील अलांड येथे एक मतदारसंघ आहे. कोणीतरी 6,018 मते वगळण्याचा प्रयत्न केला आहे. 2023 च्या निवडणुकीत अलांडमध्ये किती मते वगळण्यात आली, याबाबत आम्हाला माहिती नाही. परंतु ही संख्या 6,018 पेक्षा खूप जास्त आहे. 6,018 मतांची चोरी योगायोगाने पकडण्यात आली आहे. एका बूथ-स्तरीय अधिकाऱ्याच्या लक्षात आले की, त्याच्या काकांचे मत वगळण्यात आले आहे. त्याने त्याच्या काकांचे मत कोणी वगळले याची चौकशी केली आणि असे आढळले की, ज्याने मत वगळले तो त्याचा शेजारी आहे. त्याने त्याच्या शेजाऱ्याला विचारले, पण तो म्हणाला की, “मी कोणतेही मत हटवले नाही. ज्या व्यक्तीने मत हटवले आहे किंवा ज्याचे मत हटवले आहे, त्यांना याबाबत माहित नव्हते. याचा अर्थ दुसऱ्याच एका शक्तीने निवडणूक प्रक्रिया हायजॅक केली आणि मत हटवले.

अलांडमधील मतदारांच्या नावाने 6,018 अर्ज दाखल करण्यात आले होते. परंतु ज्या लोकांनी हे अर्ज दाखल केले होते, त्यांनी प्रत्यक्षात ते कधीच दाखल केले नव्हते. हे अर्ज सॉफ्टवेअर वापरून आपोआप दाखल करण्यात आले होते. कर्नाटक बाहेरील विविध राज्यांमधील मोबाइल नंबरचा वापर अलांडमधील नंबर डिलीट करण्यासाठी करण्यात आला होता. खासकरून काँग्रेस मतदारांना लक्ष्य करण्यात आले, असा दावा करतानाच राहुल गांधी म्हणाले की, मी असा माणूस आहे, जो माझ्या देशावर प्रेम करतो. मला आपल्या संविधानावर प्रेम आहे. मला लोकशाही प्रक्रिया आवडते आणि मी त्या प्रक्रियेचे रक्षण करतो. त्यामुळे मी या व्यासपीठावर असे काहीही बोलणार नाही, जे 100 टक्के पुराव्यांवर आधारित नसेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी म्हणाले की, मतचोरी केंद्रीय पद्धतीने केली जात आहे. एका व्यक्तींद्वारे नाही तर सॉफ्टवेअरद्वारे मतचोरी केली जात आहे. एक सॉफ्टवेअर मतदान केंद्रावरील पहिले नाव निवडत आहे आणि त्याचा वापर करून मते हटवत आहे. मतदान केंद्रावरील पहिला मतदार अर्जदार आहे याची खात्री करण्यासाठी कोणीतरी एक स्वयंचलित प्रोग्राम चालवला आहे. त्याच व्यक्तीने राज्याबाहेरून मोबाइल फोन मागवले आणि अर्ज दाखल करण्यासाठी त्यांचा वापर केला आणि आम्हाला खात्री आहे की, हे केंद्रीय पद्धतीने आणि मोठ्या प्रमाणात केले गेले. हरियाणा आणि इतर राज्यातही मतदान चोरी झाली आहे. हा हायड्रोजन बॉम्ब नसला, तरी मतदान चोरीची ही मोठी उदाहरणं आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे मतदान चोरी करणाऱ्यांना पाठिशी घालत आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

ज्ञानेश कुमार यांच्यावर मी इतका थेट आरोप का करत आहे हे समजून घेऊया, याचे कारण सांगताना राहुल गांधी म्हणाले की, कर्नाटकात या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. कर्नाटक सीआयडीने 18 महिन्यांत निवडणूक आयोगाला 18 पत्रे पाठवली आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाला काही अगदी सोप्या तथ्यांबद्दल विचारणा केली आहे. प्रथम, हे फॉर्म ज्या डेस्टिनेशन आयपी पत्त्यावरून भरले गेले होते, त्याबाबत आम्हाला सांगा. दुसरे म्हणजे ज्या डिव्हाइस डेस्टिनेशन पोर्टवरून हे अर्ज सबमिट केले गेले होते, त्याबद्दल सांगा. तिसरे सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आम्हाला ओटीपी ट्रेल्स सांगा, कारण जेव्हा तुम्ही अर्ज दाखल करता तेव्हा तुम्हाला ओटीपी मिळणे आवश्यक असते. कारण 18 महिन्यांत अठरा वेळा, कर्नाटक सीआयडीने यासाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. परंतु निवडणूक आयोग त्यांना कोणतीच मदत करत नाही. कारण त्यांना वाटतं की, आम्हाला समजेल मतचोरीचं ऑपरेशन कुठे चाललं आहे. परंतु आम्हाला आता निवडणूक आयोगातून मदत मिळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मी आता थांबणार नाही.

Neither atomic bomb nor hydrogen bomb, new attack on Rahul Gandhi’s Election Commission but old allegations

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023