विशेष प्रतिनिधी
मुंबई : Rahul Gandhi काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा मतचोरीचे आरोप केले आहेत. त्यानंतर सत्ताधारी भाजपने पुढे येत राहुल गांधींवर जोरदार पलटवार केला आहे. राहुल गांधींनी वोट चोरीचा कांगावा करणे म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ याचा प्रत्यक्ष पुरावा आहे, असं भाजपाने म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी आज दिल्ली येथे एक पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा मतचोरीच्या मुद्याला हात घातला. त्यांनी कर्नाटकच्या आलंद मतदारसंघात मोठ्या प्रमाणात काँग्रेसची मते वगळण्यात आल्याचा आरोप केला. त्यानंतर महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी चोरांच्या वाटा फक्त चोरांनाच माहिती असतात असा दावा करत त्यांचा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला. Rahul Gandhi
ते म्हणाले, २०२३ मध्ये कर्नाटक विधानसभेची निवडणूक झाली होती. त्यात मालूर विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. मात्र नंतर याच ठिकाणी वोटचोरी झाल्याचा आरोप सिद्ध झाला व त्यामुळे तेथील निवडणूक रद्द झाली. या प्रकरणी भाजपच्या उमेदवाराने कायदेशीर लढा दिला होता. केवळ आरोप करून ते सिद्ध होत नाही, तर त्यासाठी संविधानानुसार न्यायालयीन लढाई देखील लढायची असते. कायदेशीर लढाई लढायची असते. आपल्या आरोपाच्या पुष्ट्यर्थ अनेक पुरावे देखील द्यावे लागतात. मात्र राहुल गांधी यांना यातले काहीच करायचे नाही. केवळ आरोप करायचे आहेत. चोरांच्या वाटा केवळ चोरांनाच ठावूक असतात. म्हणून राहुल व्होटचोरीचा आरोप करत आहेत का? हा खरा प्रश्न आहे, असे उपाध्ये म्हणाले.
पुढे, कर्नाटकातील नाटक पुरते पडले आणि महाराष्ट्रातील मतदानाच्या नावाने थयथयाट करून मतदारांचा अपमान करत देशाला मूर्ख बनविण्याचा बनावही उघडा पडल्याचं उपाध्ये यांनी म्हटलं आहे. सोबतच, ‘निवडणुक आयोगाच्या आव्हानास सामोरे जाण्याऐवजी तोंड लपवू पोरकटपणा करणाऱ्या राहुल गांधी आणि त्यांच्या पोलिटिकल पिलावळीनेच मतदार नोंदणीत बोगस नावे घुसवून आयोगाची दिशाभूल केली नाही ना, याची चौकशी करण्याची आता आम्हीच मागणी करत आहोत,’ असे स्पष्ट केले. Rahul Gandhi
याबाबतच आणखी माहिती देतांना उपाध्ये यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या लेखी पत्राचा उल्लेख केला. ‘चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यात संगणकाद्वारे मतदार नोंदणी करण्याच्या प्रक्रियेचा गैरवापर करून कोणा टोळक्याने मोठ्या प्रमाणात मतदारांची बोगस नावे घुसविल्याचा संशय भारतीय जनता पार्टीने निवडणुकीआधीच निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रारीद्वारे व्यक्त केला होता. बोगस मतदार घुसविण्याचा प्रकार जेथे घडल्याचे राहुल गांधी म्हणतात तेथे अशा टोळ्यांना अगोदरच कामाला लावले असण्याची शक्यता आता गडद झाली आहे. म्हणूनच बोगस मतदान किंवा व्होट चोरीच्या राहुल गांधींच्या आरोपामागील षडयंत्र शोधून काढण्यासाठी तपासाची सुरुवात तेथूनच व्हावी,’ अशी मागणी उपाध्ये यांनी संपूर्ण भाजपाच्या वतीने केली आहे.
राहुल गांधी आणि कॉँग्रेस सतत निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप करत आहेत. मात्र याविरोधात न्यायालयात कोणत्याही प्रकारचे पुरावे सादर करत नाहीये. मात्र आता भाजपाने देखील या संबंधित गोष्टींची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आता यावर निवडणूक आयोग काय उत्तर देईल? आणि चौकशीअंती आणखी कोणत्या गोष्टी समोर येतील याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून आहे. Rahul Gandhi
Rahul Gandhi’s Kangawa is ‘Ulta Chor Kotwal ko Date’; BJP’s counterattack on vote-rigging allegations
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!