विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा समाजातील अनेक विचारवंत आता पुढे येऊ लागले आहेत. मराठा समाजाला आरक्षण का मिळाले नाही, प्रश्न या विचारवंतांनी आधी महाविकास आघाडीला विचारला पाहिजे, असा सल्ला मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा समाजातील विचारवंतांना दिला आहे. Radhakrishna Vikhe Patil
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या मुंबईतील पाच दिवसांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट संदर्भात जीआर जारी केला. या जीआर नुसार मराठवाड्यात कुणबी जात प्रमाणपत्र वाटप सुरु झाले आहे. मात्र या जीआरमुळे मराठा समाज आरक्षणाच्या कक्षेत आलेला नाही, असा आरोप होत आहे. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा समाजातील विचारवंतांनी आता महाविकास आघाडीला प्रश्न केला पाहिजे असे वक्तव्य केले आहे. विखे पाटील माध्यमांसोबत बोलताना म्हणाले. मराठा समजाला याआधी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना आरक्षण दिले होते.
मात्र ते आरक्षण महाविकास आघाडी सरकार कोर्टात टिकवू शकले नाही. त्यांनी सरकारची बाजू कोर्टात मांडण्यासाठी वकील देखील दिले नव्हते. आता पुन्हा एकदा फडणवीसांनीच आरक्षण दिले आहे. आरक्षणाची प्रक्रिया सुरु झाली आहे. तेव्हा आता सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मराठा समाजाला केले आहे.
मराठवाड्यात हैदराबाद मुक्ती संग्राम दिनापासून मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर निघालेल्या जीआर नुसार कुणबी दाखले देण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाने या जीआरचा मराठा समाजाला फायदा झाला नसल्याचा आरोप केला आहे.
मराठा आरक्षण गोलमेज परिषद 18 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झाली. यामध्ये मराठा मोर्चाने 10 मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने म्हटले आहे की, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चा शिष्टमंडळाची भेट घेऊन हैदराबाद गॅझेट जीआर मराठा समाजाला कसा लागू होतो हे स्पष्ट करावे. निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापनेपूर्वी आणि समिती स्थापनेनंतर मिळालेल्या कुणबी नोंदीची श्वेतपत्रिका जाहीर करावी. मराठा समाजाला दिलेल्या एसईबीसी आरक्षणाला ओबीसी सारख्या सर्व सवलती देऊन ते आरक्षण कोर्टामध्ये टिकवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे, अशा मागण्या मराठा आरक्षण गोलमेज परिषदेत करण्यात आल्या आहेत.
Mahavikas Aghadi why the Maratha community did not get reservation, advises Radhakrishna Vikhe Patil
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!