विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Raut : येत्या काही दिवसातच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. मात्र या ट्रेनचा निर्माण हा मुंबईला लुटण्यासाठी केला जात आहे. मुंबईचा घास गिळण्यासाठी मुंबईतून सुरतला बुलेट ट्रेन निर्माण केली जात आहे. मुंबई लुटण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी राज्य सरकारवर केला आहे.
मुंबई पासून इतर कुठे ही ट्रेन का नाही, असा सवाल देखील उबाठाचे नेते संजय राऊत यांनी यावेळी सरकारला केला. यादरम्यान त्यांनी जयंत पाटील यांच्यावर झालेल्या टीकेसंदर्भात देखील भाष्य केले. राऊत यांच्या मते जयंत पाटील यांच्यावर दुसऱ्या पेक्षात जाण्यासाठी दबाव निर्माण करण्यात येत आहे. मात्र त्यांनी नकार दिल्यामुळे त्यांच्यावर राग आहे. परिणामी या निर्माण झालेल्या द्वेषातुनच त्यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली गेली असे मत देखील त्यांनी व्यक्त केले. Sanjay Raut
संजय राऊत म्हणाले की, नारायण राणे यांच्या मुलानेच वडिलांच्या नावावरून टीका करण्यास सुरवात केली होती. मात्र त्याला भाजपने पाठीशी घातले म्हणून ही सर्व घाण वाढत गेली आहे. आम्ही कधी कुणाचा बाप काढला नाही, त्यांचे कर्तृत्व काढले नाही. गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या वडिलांवर चुकीचे बोलणं हे अतिशय दुर्दैवी आहे. फडणवीसांनी त्यांच्या टीमला संस्कार शिकवावे. १२ ते १३ वेळेस समज देऊनही जर हा माणूस ऐकत नसेल तर याचा अर्थ त्याला तुमचा पाठिंबा आहे, असा काढता येऊ शकतो.
तसेच यादरम्यान राऊत यांनी पुन्हा एकदा महायुतीचे 90 टक्के आमदार हे वोट चोरीच्या माध्यामातूनच निवडून आले आहेत असा टोला देखील लगावला आहे. पुढे बोलतांना राऊत यांनी शिंदेंचा पक्ष आता भाजपात विलीन होणार असे धक्कादायक विधान देखील केले. मी जे सांगतो ते नेहमी खरे होते असं देखील ते यावेळी म्हटले. Sanjay Raut
All efforts are to loot Mumbai; Sanjay Raut tells the government on Mumbai bullet train
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!