विशेष प्रतिनिधी
मुंबई : Rahul Gandhi : गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सतत निवडणूक आयोगावर वोटचोरीचे आरोप करत आहेत. मात्र त्यांनी अद्यापही न्यायालयात याविषयीचे ठोस पुरावे सादर केलेले नाहीत. मात्र आता यावरून भाजपाने राहुल गांधींना चांगलेच फैलावर घेतले आहे. राहुल गांधी म्हणजे सराईत खोटेपणा आणि माफीवीर असे म्हणत भाजपाने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
याबद्दल भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत राहुल गांधींचा खोटे आरोप करण्याचा इतिहासच वाचून दाखवला. ‘मतचोरीबद्दल राहुल गांधी सराईतपणे आत्मविश्वासाने ढळढळीत खोटे कसे बोलतात याचे अनेकांना आश्चर्य वाटत असेल, पण सराईत खोटेपणा व माफीवीर हीच राहुल गांधीची खरी ओळख आहे. त्यांचा खोटे बोलण्याचा व पसरविण्याच्या आत्मविश्वास पाहून गोबेल्सही शरमला असता हे नक्की!’, या भाषेत उपाध्ये यांनी राहुल गांधी यांना चांगलेच सुनावले आहे.
याआधी राफेल प्रकरणात राहुल गांधींना माफी मागायला लागली होती. त्याची आठवण काढत उपाध्ये यांनी गांधींचा माफीनाम्यांचा पाढा वाचायला सुरुवात केली, ‘राफेल प्रकरणात खोटे बोलण्याबद्दल, दिशाभूल करण्याबाबत त्यांना सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागावी लागली होती हे सर्वश्रुतच आहे. पण दिशाभूल करण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही.’
पुढे उपाध्ये म्हणाले की ‘२०१४ मधील निवडणूक रॅलीत राहुल गांधींनी महात्मा गांधीच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचा आरोप केला होता. यावरून त्यांना न्यायालयात देखील खेचण्यात आले होते. त्यावेळी राहुल गांधींनी सुरुवातीला राणा भीमदेवी थाटात आपण आपल्या विधानावर ठाम असल्याची भूमिका घेतली व पुरावे सादर करू असे सांगितले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने कडक भूमिका घेताच राहुल गांधींनी भूमिका बदलत संघाला हत्येबद्दल दोषी मानत नसून संघाशी संबंधित लोक त्या हत्येत सहभागी होते, अशी तकलादू सारवासारव करत कोलांटउडी मारली.’
त्यानंतर, २०१६ मध्ये राहुल गांधींनी सर्जिकल स्ट्राईक नंतर निवडणूक प्रचारात ‘खून की दलाली’ असा आरोप पंतप्रधानांवर केला होता. मात्र या वेळीही आरोपानंतर सगळीकडून टीका सुरू झाल्यावर राहुल गांधींनी भूमिका बदलली आणि आपण सर्जिकल स्ट्राईकच्या विरोधात नाही असे जाहिर केल्याचं देखील केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच मोदी नावाची बदनामी केल्यावरूनही त्यांना न्यायालयाने शिक्षा दिल्याचं, उपाध्ये यांनी सांगितलं.
तसेच, सावरकरांची बदनामी करण्यावरून देखील त्यांना न्यायालयात खेचण्यात आले आहे. तिथेही त्यांनी सुरुवातीला सगळे पुरावे सादर करेनच अशी भूमिका घेतली होती. प्रत्यक्षात मात्र ते टाळाटाळ करत आहेत,’ असे उपाध्ये यांनी स्पष्ट केले. ‘खोटे बोलणे, बेछूट आरोप करणे ही राहूल गांधीची खासियत आहे,’ असे देखील संबंधित पोस्ट मध्ये म्हटले आहे.
Rahul Gandhi is a liar and an apologist; BJP has made history
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!