विशेष प्रतिनिधी
मुंबई : India-Pakistan cricket आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यांच्या जाहिरातींवरून जाहिरातींना आक्षेप घेत शिवसेना ठाकरे गटाने सोनी टीव्हीला पत्र पाठवले होते. त्यानंतर आता सोनी पिक्चर्स नेटवर्क्सने शिवसेनेची माफी मागितली आहे. तसेच कंपनीने प्रेक्षकांच्या अभिप्रायाला गांभीर्याने घेतले जात असल्याचे सांगत, आपल्या मनात राष्ट्र, प्रेक्षक आणि नागरिकांविषयी सर्वोच्च आदर असल्याचे म्हटले आहे. India-Pakistan cricket
आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामन्याला शिवसेनेने मैदानाबाहेरून विरोध दर्शवला होता. त्यातच, सामन्याच्या आधी सोनी टीव्हीने सोशल मीडियावर केलेल्या जाहिरातींचा दर्जा “थिल्लर” आणि “अश्लील” असल्याचा आरोप शिवसेनेच्या युवा नेते अखिल अनिल चित्रे यांनी केला होता. तसेच सोशल मीडयावर भारत-पाकिस्तान सामन्याच्या जाहिराती दाखवू नयेत, यासाठी त्यांनी याबाबत थेट सोनी टीव्हीला पत्र पाठवून जाहिराती थांबवण्याची मागणी केली होती. India-Pakistan cricket
आता सोनी पिक्चर्स नेटवर्क्स कंपनीने अखिल अनिल चित्रे यांच्या पत्राला लेखी उत्तर दिले आहे. आमचा हेतू कधीच देशाचा किंवा सशस्त्र दलांचा अपमान करण्याचा नव्हता. आम्ही सदैव राष्ट्राच्या आणि सशस्त्र दलांच्या सोबत उभे आहोत. प्रमोशन मोहिमेमुळे भावना दुखावल्या असतील तर आम्ही मनापासून दिलगीर आहोत. भविष्यात कोणतीही मोहिम नागरिकांच्या भावना दुखावणारी नसावी याची काळजी घेतली जाईल. मॅच दाखवताना सोशल मीडियावर भारत पाकिस्तान मॅच संदर्भात अशा थिल्लर जाहिराती दाखवल्या जाणार नाहीत. अगोदरच्या सामन्याला केले पण आता जाहिराती केल्या जाणार नाहीत, असे सोनी पिक्चर्स नेटवर्क्स कंपनीने शिवसेना ठाकरे गटाला दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.
दरम्यान, मागील रविवारी झालेला आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामना चांगलाच वादग्रस्त ठरला. शिवसेनेसह अनेक राजकीय पक्षांनी मैदानाबाहेरून विरोध दर्शवला होता. तर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने पाकिस्तानच्या कर्णधारासोबत हस्तांदोलन न केल्यामुळे आणखीनच वाद वाढला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकातील दुसरा टी-20 सामना रविवार, 21 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता होणार आहे.
Sony TV apologizes to Shiv Sena over India-Pakistan cricket match advertisement
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!




















