विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांनी दिलेल्या एक महिन्याच्या युद्धविरामाच्या (ceasefire) प्रस्तावाला ठाम नकार देत आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले. “बंदीची गरज नाही, बंदुका खाली ठेवा. सरकार तुमच्यावर एकही गोळी झाडणार नाही. पण निरपराध नागरिकांच्या जीवावर उठाल, तर गोळीला गोळीनेच उत्तर दिले जाईल” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
दिल्लीमध्ये आयोजित ‘नक्षलमुक्त भारत: मोदींच्या नेतृत्वाखाली रेड टेररचा अंत’ या विषयावरील परिसंवादाच्या समारोप सत्रात ते बोलत होते.
शहा म्हणाले, “अलीकडे नक्षलवाद्यांच्या वतीने एक पत्र प्रसिद्ध झाले. त्यात आतापर्यंत झालेल्या हिंसाचाराला चूक ठरवून युद्धविराम जाहीर करण्याची आणि सरकारने कारवाया थांबवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. पण सरकारला कोणत्याही प्रकारची युद्धबंदी मान्य नाही. आत्मसमर्पण करण्यास इच्छुक असाल तर लगेच शस्त्रे खाली ठेवा.”
गृहमंत्र्यांनी सांगितले की केंद्र सरकारने आत्मसमर्पण करणाऱ्या नक्सलवाद्यांसाठी उत्तम पुनर्वसन धोरण आखले आहे. “आम्ही नेहमी नक्षलवाद्यांना पकडण्यापेक्षा त्यांना आत्मसमर्पणाची संधी देण्यावर भर देतो. समाजात पुन्हा सामावून घेण्यासाठी सर्व प्रकारची मदत केली जाईल. पण जर तुम्ही शस्त्र घेऊन निर्दोष भारतीय नागरिकांचा बळी घेत असाल, तर सुरक्षा दलांकडे कठोर पाऊल उचलण्याशिवाय दुसरा मार्ग नाही,” असे त्यांनी सांगितले.
या वक्तव्यामुळे नक्षलवादाबाबत केंद्र सरकारची कठोर भूमिका पुन्हा अधोरेखित झाली असून पुढील काळात कारवायांची तीव्रता आणखी वाढण्याचे संकेत मिळत आहेत.
Answer bullet with bullet, no option but to surrender, Union Home Minister Amit Shah warns Naxalites
महत्वाच्या बातम्या
- भारतासारख्या हिंदूराष्ट्रात I love Mahadev हेच उद्गार चालणार; नितेश राणेंचा एल्गार
- Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मागितली केंद्राकडून मदत
- Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- न्यायालयांनी गंभीर प्रकरणांची दररोज सुनावणी करावी; आरोपपत्र दाखल केल्यानंतर 2 महिन्यांच्या आत बलात्कार प्रकरणांची सुनावणी पूर्ण करा
- Sonam Wangchuk : लेह हिंसाचारासाठी जबाबदार धरत सोनम वांगचुक यांना अटक




















