विशेष प्रतिनिधी
बलरामपूर : गजवा – ए-हिंद”च्या नावाखाली अस्थिरता निर्माण करण्याचा डाव रचणाऱ्यांना थेट जहन्नुमची (नरकाची) तिकिटे मिळतील, असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. Yogi Adityanath
बलरामपूर येथे एका सार्वजनिक सभेत बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, “काही लोक भारतात राहतात; पण ‘गजवा-ए-हिंद’च्या घोषणांनी देशविरोधी कारवायांना चालना देतात. हे भारताच्या भूमीत कधीही मान्य होणार नाही. हा देश संतांच्या आदर्शांवर चालला आहे आणि पुढेही तसाच चालेल.”
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “गजवा-ए-हिंदचे स्वप्न पाहणे म्हणजे थेट जहन्नुमचे तिकीट काढणे. जर कोणी स्वतःला नरकात ढकलू इच्छित असेल, तर त्यांनी या नावाखाली देशात अस्थिरता निर्माण करून बघावी.”
योगी आदित्यनाथ यांनी इशारा दिला की, “या विचारधारेने सक्रियपणे काम करणाऱ्यांनी कान उघडे ठेवून ऐकावे लवकरच त्यांचाही बंदोबस्त चांगूर बाबा उर्फ जलालुद्दीनप्रमाणे केला जाईल.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी सांगितले की, जर कोणीही सण-उत्सवांच्या काळात उपद्रव करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना अशी शिक्षा दिली जाईल की त्यांच्या येणाऱ्या पिढ्याही ती विसरणार नाहीत. जे लोक अशा मानसिकतेने जगत आहेत की त्यांना आपली गैरसमज दूर करावा. तो काळ गेला आहे, आधी राज्य सरकार अशा लोकांना सहन करत असे. जो कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल, त्यावर कडक कारवाई केली जाईल.
Dreaming of Gajwa-e-Hind means buying a ticket straight to hell: Chief Minister Yogi Adityanath
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…




















