विशेष प्रतिनिधी
मुंबई :Praveen Darekar राज्य सरकारने महाराष्ट्रातील पुनर्विकास प्रकल्पांवर देखरेख करण्यासाठी महाराष्ट्र स्वयंपुनर्विकास प्राधिकरण स्थापन केले आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट मंजुरी सुलभ करणे, पारदर्शकता वाढवणे आणि निवासी आणि व्यावसायिक पुनर्विकास प्रकल्प वेळेवर पूर्ण करणे सुनिश्चित करणे आहे. महत्त्वाचे म्हणजे स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाचे पहिले अध्यक्ष म्हणून भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांना संधी देण्यात आली.Praveen Darekar
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात आदेश काढून प्रवीण दरेकर यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. प्रवीण दरेकर तथा विधान परिषद सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली 24 एप्रिल 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या इमारतींचा स्वयंपुनर्विकास करण्याकरीता प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनातून सवलती देण्याबाबत 13 सप्टेंबर 2019 रोजीच्या शासन निर्णयातील विविध मुद्यांची पुर्तता/अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांची शासनास शिफारशी करण्यासाठी अभ्यासगट नेमण्यात आला होता.
या अभ्यासगटाने 14 जुलै 2025 रोजी विधानभवन येथे मुख्यमंत्री फडणवीस यांचेकडे अहवाल सादर केला आहे. सदर अभ्यासगटाने सादर केलेल्या शिफारशींची प्रभावी अंलबजावणी होण्याकरीता स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरण स्थापन करण्यास मुख्यमंत्रीफडणवीस यांची मान्यता प्राप्त झाली आहे. तसेच, सदर प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून प्रविण दरेकर, यांना नियुक्त करून त्यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यास विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी महोदय यांनी मान्यता दिली आहे.
Maharashtra Self-Redevelopment Authority to oversee redevelopment projects, Praveen Darekar as chairman
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…




















