Asaduddin Owaisi दिल्लीत बसलेल्या जादुगारमुळे दोन पिढ्यांचे नुकसान ; असदुद्दीन औवेसी यांची टीका

Asaduddin Owaisi दिल्लीत बसलेल्या जादुगारमुळे दोन पिढ्यांचे नुकसान ; असदुद्दीन औवेसी यांची टीका

Asaduddin Owaisi

विशेष प्रतिनिधी

पुणे : देशात सध्या एक जादुगार दिल्लीत बसून जादूचे प्रयोग करत आहे. यामुळे देशातील दोन पिढ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जनरेशन मिलेनियल्स आणि जेंन झी चे मोठे नुकसान झाले आहे. देशातील २५ टक्के युवकांना दर्जेदार शिक्षण मिळाले नाही. या पीढीला पेपर लीक, भ्रष्ट्राचार सारख्या गोष्टींचा सामना करावा लागत आहे. ही पिढी देशात ब्रीज तुटताना पाहत आहे. तसेच देशात गैरजिम्मेदार सरकार पाहत आहे, अशा शब्दांत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टिका केली. Asaduddin Owaisi

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे मंगळवार (दि.३०) रोजी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते, देशातील ६५ टक्के लोकसंख्या ४५ वयापेक्षा कमी आहे. सध्या या पीढीला दिल्लीतील जादूगार वेगवेगळ्या जादू दाखवत आहे. मात्र, जेव्हा ही पीढी वृद्धत्वाकडे जाईल, तेव्हा त्यांच्या हातात काहीच नसणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मिलेनियल्स आणि जेंन झी या दोन पीढ्या बर्बाद केल्या आहेत. जेव्हा ही पीढी प्रश्न विचारेल, तेव्हा अवघड होऊन बसेल, अशी चेतावनी औवेसी यांनी दिली.

पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळायची काय गरज होती, असा सवाल करत औवेसी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. एशिया कप स्पर्धेत फायनलमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानी संघाचा पराभव केल्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिन्दुर ३ अस ट्विट करत शुभेच्छा दिल्या. यावर बोलताना औवेसी म्हणाले भारतीय सैन्याची तुलना क्रिकेट मॅचशी करुन प्रधानमंत्री मोदी यांनी देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानांचा अपमान केला आहे. पाकिस्तान सोबत मॅच खेळलो नसतो तर त्यांना मिळणारा पैसा मिळाला नसता. पहलगाम हल्ल्यांनतर आपण ऑपरेशन सिन्दुर केले. त्यानंतर आपण पाकिस्तान सोबतचे सर्व संबंध तोडले आहे, असे असताना पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळणे गरजेचे होते का असा प्रश्न औवेसी यांनी उपस्थित केला.

मुस्लीम लोकसंख्येबाबत औवेसी म्हणाले की, देशात मुस्लीम लोकसंख्येबाबत चुकीचे नॅरेटीव्ह पसरवले जात आहे. केंद्र सरकारच्या रिपोर्टनुसार भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या कधीही हिंदूपेक्षा अधिक होणार नाही. रिपोर्टनुसार साधारण २०७५ पर्यंत देशातील हिंदूची लोकसंख्या स्टेबल होणार आहे, तर मुस्लिमांची लोकसंख्या साधारण २१०० पर्यंत स्टेबल होऊ शकते. त्यावेळी देखील देशात मुस्लीमांचे प्रमाण साधारण २० ते २२ टक्के असेल, त्यामुळे मुस्लीमांची लोकसंख्या कधीही हिंदूपेक्षा जास्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे, असे ओवैसी म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण होत आहे, त्यांना शुभेच्छा देणार का अस यावेळी ओवेसी यांना विचारलं असता ते म्हणाले की, ऑर्गनायझर मॅक्झिनमध्ये आम्हाला भारतीय संविधान मान्य नाही, आम्हाला मनुस्मृती मान्य आहे, असे लिहलं होते.देशाचा तीन कलरचा राष्ट्रीय ध्वज देखील अशुभ असल्याचे यांनी सुरुवातीला म्हंटले होते. या संघटनेला महात्मा गांधी यांच्या हत्यानंतर वल्लभभाई पटेल यांनी बँन केल होते त्यांना शुभेच्छा देण्याचा प्रश्नच येत नाही. समुद्राचे दोन किनारे कधीच एकत्र येऊ शकत नाही. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या लढात सहभाग घेतला नाही अशांना शुभेच्छा देण्याचं प्रश्नच येत नसल्याचं यावेळी औवेसी म्हणाले.

शेजारी देशासोबतच्या संबंधांवर बोलताना औवेसी म्हणाले की, श्रीलंकेत चीन ने पोर्ट विकसित केले आहे. पाकिस्तानमध्ये ७५ टक्के इनवेंस्टमेंट चीनची आहे. बांग्लादेशात पर चीनने रस्ते विकासीत करण्यास सुरुवात केली आहे, त्याचबरोबर आएएसआय देखील बांग्लादेशात सक्रीय आहे. नेपालमधील परस्थिती आपण सर्वांनी पाहिली आहे, भविष्यकाळात आपल्याला दोन आघाड्यांवर लढावे लागणार असून पाकिस्तान कडून आपल्याला कायमच थ्रेट राहणार आहे. त्यांचे शेपूट वाकडे ते वाकडेच राहणार आहे. त्यांच्याबाबत कायमच सतर्क राहावेच लागेल. पाकिस्तानची मिल्ट्री जोपर्यंत डॉमिनेंट राहिल, तोपर्यंत भारताला धोका राहणार, असेही ओवैसी म्हणाले.

Two generations lost due to the magician sitting in Delhi; Asaduddin Owaisi criticizes

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023