विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? त्यांनी शेतकऱ्यांना काय दिले? शेतकऱ्यांचे किती अश्रू पुसले? शेतकऱ्यांच्या बांधावर किती वेळा गेले? हे सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माहिती आहे. त्यामुळे आधी उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये कर्जाची घोषणा केली होती. त्यांना पैसे देण्याचा निर्णय घेतला मात्र, दिले नाही. यातील 20 लाख शेतकऱ्यांना आम्ही पैसे दिले. त्यामुळे ठाकरे यांनी स्वतः आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे.Uddhav Thackeray
राज्यातील महायुती सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूचे आहे. मी मुख्यमंत्री असताना आम्ही शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली होती. तसीच योजना आमच्या महायुतीच्या काळात आम्ही कायमस्वरूपी तयार केली. यात वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतला. ती योजना आजही सुरू आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय आम्ही घेतले आहेत, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.Uddhav Thackeray
एकनाथ शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सर्व महायुतीतील नेते शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री, मी स्वतः आणि अजित पवार आमच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आलेले संकट फार मोठे आहे. ते छोटे संकट नाही. ही आपत्ती मोठी आहे.
गेल्या अनेक वर्षात अशा प्रकारे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला नव्हता. यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेच आहे. त्याच बरोबर जमीन खरडून गेली आहे, जमीन वाहून गेली आहे, जनावरांचे नुकसान झाले आहे, घरांची पडझड झाली आहे. या सर्वांचा विचार करून आम्ही मंत्रिमंडळात देखील चर्चा केली असल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे नियम, अटी, शर्ती सर्व बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काय पडेल? त्याच्या डोळ्यातले अश्रू कशा पद्धतीने पुसले जातील, यावर आमचे सरकार अतिशय गंभीर असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. एक दोन दिवसात यावर चर्चा करून निर्णय घेणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला.
आम्ही देणारे आहोत, नेहमी देत आलेलो आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा महायुती सरकार लवकरच देईल, असा दावा देखील शिंदे यांनी केला. शेतकऱ्यांना मदत करताना आम्ही आखडता हात घेणार नाही. शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांचा चेक देणे सुरू केलेले आहे. धान्य देण्याचे काम देखील सुरू आहे. तात्काळ दिलासा देण्याची प्रक्रिया या आधीच सुरू झाली असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. अटी, शर्ती बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे हे सरकार आहे. आतापर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिलेलो आहोत. त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
लाडकी बहीण योजनेला तर उद्धव ठाकरे यांनी विरोध केला होता. त्या विरोधामध्ये त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे त्यांना या योजनेवर बोलण्याचा अधिकार नाही. लाडक्या बहिण योजनेत खोडा घालणाऱ्या सर्वांनाच चांगले जोडे लाडक्या बहिणीने दाखवले आहेत. त्यामुळे लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. महायुती सरकारने ही योजना सुरू केली आहे. ही योजना कधीही बंद होणार नसल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. यावर कितीही अफवा आणि बदनाम करण्याचे कारस्थान केले. तरी लाडक्या बहिणी त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. त्यांना विरोध करणारे हे सावत्र आणि दृष्ट भाऊ आहेत, हे त्यांनी ओळखले असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.
What did you do for farmers when you were the Chief Minister? Introspect: Eknath Shinde attacks Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!