विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray लेह लडाखसाठी लढणारे सोनम वांगचूक हे पाकिस्तान जाऊन आले म्हणून देशद्रोही ठरत असतील तर गुपचूप पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफचा केक खाऊन आलेल्या नरेंद्र मोदी यांना काय म्हणायचे, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला आहे.Uddhav Thackeray
शिवसेना ठाकरे गटाच्या शिवाजी पार्क येथे झालेल्या दसरा मेळाव्यातून बोलताना ठाकरे म्हणाले, पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक हे लेह लडाख वाचवण्यासाठी लढा देत आहेत. त्यांना रासूका कायद्याखाली अटक केली आहे. सोनम वांगचूक यांनी लडाखमध्ये गारठवणाऱ्या थंडीत उभे राहाणाऱ्या आपल्या सैनिकांसाठी सौरऊर्जेवर चालणाऱ्या छावण्या बांधून दिल्या. ते आता न्याय हक्कासाठी लढत आहेत. त्यांच्यासोब लेह लडाखमधील जेन झी देखील रस्त्यावर उतरली. आता मोदींनी त्यांना एक वर्षासाठी रासूका कायद्याखाली तुरुंगात टाकले आहे. जोपर्यंत सोनम वांगचूक हे मोदींची स्तुती करत होते तोपर्यंत ते देशद्रोही नव्हते. आता ते पाकिस्तानात जाऊने आले होते असे सांगून त्यांना अटक केली आहे Uddhav Thackeray
सरकार चालवण्याचा आणि भाजपचा दुरान्वयानेही संबंध नाही. तीन वर्षे झाले मणिपूर जळत आहे. तीन वर्षानंतर नरेंद्र मोदी हे नुकते तिथे जाऊन आले. आम्हाला अपेक्षा होती की पंतप्रधान मणिपूरला जात आहेत तेव्हा ते तिथला वाद मिटवतील. मध्यस्थी करतील तर तिथे गेल्यानंतर ते म्हणाले की मणिपूरच्या नावातच ‘मणी’ आहे. हे तुम्हाला तिथे जाऊन सांगायची काय गरज होती. तुम्हाला मणिपूरमधील मणी दिसला पण त्यांच्या डोळ्यातील पाणी तुम्हाला दिसले नाही. तुम्हाला मणिपूरमधील मणीच पाहायचा होता तर मग तिकडे जाण्याची गरज काय होती, असा सवाल ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना केला.
बिहारमधील महिलांना केंद्र सरकारने दिलेल्या 10-10 हजारांवरुनही ठाकरेंनी मोदींवर टीका केली. बहिणींना पैसे देऊन मतं विकत घ्यायची आहेत का, अस सवाल करत ठाकरे म्हणाले, भाजप आता अमिबा झाला आहे. अमिबा हा एकपेशीय प्राणी आहे. तसाच भाजप आता कुठला ही हात काढतो आणि तिकडे असेल त्या पक्षासोबत युती करतो, आणि हाताला लागलेला पक्ष खिशात घालतो. अमिबा सारखा भाजप एक एकपेशीय प्राणी झाला आहे. फक्त मीच राहिलो पाहिजे, असे भाजपला वाटत आहे. ज्या प्रमाणे अमिबा कसाही वाढतो, कुठूनही वाढतो तसा भाजप कसाही वाढत आहे. कोणताही आकार-उकार या पक्षाला राहिलेला नाही.
Sonam Wangchuk is a traitor, what should we say about those who eat Nawaz Sharif’s cake? Uddhav Thackeray questions Modi
महत्वाच्या बातम्या
- Ravindra Dhangekar चंद्रकांतदादा गुन्हेगारांना पाठीशी का घालतात, रवींद्र धंगेकरांचा थेट सवाल
- Uddhav Thackeray : मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? आत्मचिंतन करा : एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
- Congress : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर आंदोलन करणार
- Ajit Pawar : अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट, तासभर चर्चा झाल्याने राजकीय खळबळ




















