विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार असून या अनुषंगाने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी विनंती केली होती. या नामकरणासाठी पंतप्रधानांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.Devendra Fadnavis
पुढील आठवड्यात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होत आहे. या उद्घाटनापूर्वी विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीचा रेटा वाढला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आज पार पडली. या बैठकीत बोलताना फडणवीस म्हणाले, नवी मुंबई विमनातळाला नाव देण्याबाबत राज्य सरकारचा इरादा बदललेला नाही आणि केंद्र शासनाचा देखील वेगळा विचार नाही. केंद्र सरकारने विमानतळ बांधकामाला परवानगी देताना ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ अशा नावाने पूर्वी परवानगी दिली होती. त्यामध्ये नामविस्तार होऊन आता “लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ” असे होईल. राज्य सरकारने पाठविलेल्या प्रस्तावानुसारच विमानतळास नाव देण्यात येईल.Devendra Fadnavis
नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रत्यक्षात प्रवासी वाहतूक सुरू होईल तेव्हा ‘लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ अशीच अधिकृत उद्घोषणा निश्चितपणे होईल. या ‘ड्राय रन’ कालावधीत विमान प्रवासी यांचे पुढील कालावधीचे आगाऊ बुकिंग नोंदवणे, तांत्रिक बाबींची सज्जता अशा स्वरूपाची कार्यवाही होईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
The airport will be named after Diba; Chief Minister Devendra Fadnavis assures
महत्वाच्या बातम्या
- Ravindra Dhangekar चंद्रकांतदादा गुन्हेगारांना पाठीशी का घालतात, रवींद्र धंगेकरांचा थेट सवाल
- Uddhav Thackeray : मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? आत्मचिंतन करा : एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
- Congress : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर आंदोलन करणार
- Ajit Pawar : अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट, तासभर चर्चा झाल्याने राजकीय खळबळ




















