विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Shirsat शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेसरण या लोकांनी रचले होते. विनायक राऊत त्यात प्रमुख होते, हे नाव मी आज जाहीर करतो. कारण रामदास कदम यांनी चुकीचा आरोप केलेला नाही, असा दावा करत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी कदम यांना समर्थन दिले आहे.Sanjay Shirsat
दोन्ही शिवसेनेचा दसरा मेळावा गुरुवारी झाला. मात्र शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूवरून आरोप केले होते . उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे पार्थिव दोन दिवस घरात ठेवून छळ केला, असे त्यांनी म्हटले.Sanjay Shirsat
संजय शिरसाट म्हणाले की, बाळासाहेबांचे निधन झाले, तेव्हा मीदेखील दोन दिवस मातोश्रीवर होतो. माझ्या माहितीप्रमाणे विनायक राऊत यांनी दोन दिवसाआधीच तयारी सुरू केली होती. त्यावेळच्या पोलीस आयुक्तांनीही याबाबत मातोश्रीला प्रश्न विचारला होता. काय झालंय? आम्हाला माहिती द्या? त्यानंतर दिवाकर रावते आणि इतर नेत्यांनी शिवाजी पार्कवर जाऊन जी तयारी केली ती पुन्हा तोडून टाकली.
सत्य सर्वांनाच माहीत आहे, पण त्याचा उहापोह आम्ही कधी केला नाही. आता झालेल्या गोष्टींची पुन्हा चर्चा करून आम्हाला बाळासाहेबांच्या आत्म्याला दुखवायचे नाही, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.
These people had already planned Balasaheb’s funeral; Sanjay Shirsat claims
महत्वाच्या बातम्या
- Ravindra Dhangekar चंद्रकांतदादा गुन्हेगारांना पाठीशी का घालतात, रवींद्र धंगेकरांचा थेट सवाल
- Uddhav Thackeray : मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? आत्मचिंतन करा : एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
- Congress : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर आंदोलन करणार
- Ajit Pawar : अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट, तासभर चर्चा झाल्याने राजकीय खळबळ




















